स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांची संयुक्त कारवाई, दोन वेगळ्या घटनात देशी कट्ट्यासह दोन इसमाना अटक (Joint action by local crime branch and Ballarpur police, two men including a local gang member arrested in two separate incidents)
बल्लारपूर :- शहरात देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र (देशी कट्टा) बाळगून फिरत असलेल्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई ५ डिसेंबर रोजी पेपर मिल न्यू कॉलनीतील आटा चक्की जवळ करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल दिनेश डंगोरे (३९), रा. पंडित दीनदयाल वॉर्ड, बल्लारपूर असे आहे. पथकाने आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीची लोखंडी बंदूक जप्त केली असून तिची अंदाजे किंमत ५ हजार रुपये आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक काँक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, सफौ. स्वामीदास चालेकर, पोहवा किशोर वैरागडे, अजय बांगेसर, पो.अं. गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, ऋषभ बारसिंगे यांनी केले. पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन बल्लारपूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन बल्लारपूर यांची उल्लेखनिय कामगीरी अशी आहे की, दिनांक - ०५/१२/२०२५ रोजी सपोनि मदन दिवटे, शब्बीर पठाण व डीबी स्टाफ असे अवैद्य धंदेवरती कार्यवाही करणे व रेकॉर्डवरील आरोपी चेक करणेकामी पोलीस ठाणे हद्दीत रवाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराद्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, रेल्वे नगर वार्ड, बल्लारपूर येथील राहणारा इसम नामे नवाब शेख हा आपले राहते घरी अवैद्रद्यरित्या अग्नीशस्त्र बाळगुन आहे. अशी माहिती मिळाल्यावरून सदर मिळालेली माहीती पोनि बिपीन इंगळे सा. यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनात मुखबीरने सांगीतलेल्या खबरेप्रमाणे मोहम्मद इस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख वय ३० वर्षे व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. रेल्वेनगर वार्ड, बल्लारपूर जि. चंद्रपूर याचे घराची घर झडती घेतली असता एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीचे 07 mm बोर असलेले अग्निशस्त्र व ०२ नग पितळी धातुचे जिवंत काडतुस मिळुन आल्याने भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक ईश्वर कातकडे, श्री. सुधीर नंदनवार सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक बिपीन इंगळे, सपोनि मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण सफौ. रणविजय ठाकुर, पोहवा. सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, खंडेराव माने, गुरू शिंदे इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने केली असुन पुढील तपास सपोनि शब्बीर पठाण हे करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या