महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या तर भाऊबीज साठी अतिरिक्त सुट्टी जाहीर (Maharashtra government announces 24 public holidays for the year 2026, additional holiday for Bhaubij)
मुंबई :- महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या असून, भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील. सार्वजनिक सुट्ट्या, २०२६. क्रमांक सार्वसु-११२५/प्र.क्र.१९९/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयुडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२६ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्हणून जाहीर करीत आहे.
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, २०२६ ६ माघ, शके १९४७ सोमवार, महाशिवरात्री १५ फेब्रुवारी, २०२६ २६ माघ, शके १९४७ रविवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, २०२६ ३० माघ, शके १९४७ गुरुवार, होळी (दुसरा दिवस) ०३ मार्च, २०२६ १३ फाल्गुन, शके १९४७ मंगळवार, गुढीपाडवा १९ मार्च, २०२६ २८ फाल्गुन, शके १९४७ गुरुवार, रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-१) २१ मार्च, २०२६ ३० फाल्गुन, शके १९४७ शनिवार, रामनवमी २६ मार्च, २०२६ ०५ चैत्र, शके १९४८ गुरुवार, महावीर जन्म कल्याणक ३१ मार्च, २०२६ १० चैत्र, शके १९४८ मंगळवार, गुड फ्रायडे ०३ एप्रिल, २०२६ १३ चैत्र, शके १९४८ शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, २०२६ २४ चैत्र, शके १९४८ मंगळवार, महाराष्ट्र दिन ०१ मे, २०२६ ११ वैशाख, शके १९४८ शुक्रवार, बुध्द पौर्णिमा ०१ मे, २०२६ ११ वैशाख, शके १९४८ शुक्रवार, बकरी ईद (ईद-उल-झुआ) २८ मे, २०२६ ०७ जेष्ठ, शके १९४८ गुरुवार, मोहरम २६ जून, २०२६ ०५ आषाढ, शके १९४८ शुक्रवार, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट, २०२६ २४ श्रावण, शके १९४८ शनिवार पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट, २०२६ २४ श्रावण, शके १९४८ शनिवार, ईद-ए-मिलाद २६ ऑगस्ट, २०२६ ०४ भाद्रपद, शके १९४८ बुधवार, गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर, २०२६ २३ भाद्रपद, शके १९४८ सोमवार, महात्मा गांधी जयंती ०२ ऑक्टोबर, २०२६ १० आश्विन, शके १९४८ शुक्रवार, दसरा(विजयादशमी) २० ऑक्टोबर, २०२६ २८ आश्विन, शके १९४८ मंगळवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) ०८ नोव्हेंबर, २०२६ १७ कार्तिक, शके १९४८ रविवार दिवाळी (बलिप्रतिपदा) १० नोव्हेंबर, २०२६, १९ कार्तिक, शके १९४८ मंगळवार, गुरुनानक जयंती २४ नोव्हेंबर, २०२६ ०३ मार्गशिर्ष, शके १९४८ मंगळवार , ख्रिसमस २५ डिसेंबर, २०२६ ०४ पौष, शके १९४८ शुक्रवार, खालील सुट्टी बँकांसाठी मर्यादित आहे. सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही. १ बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल, २०२६ ११ चैत्र, शके १९४८ बुधवार सुट्टी राहणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या