बल्लारपूर :- भारताला संविधानाच्या माध्यमातून एकसूत्रात बांधून ठेवणारे आज जगाच्या दृष्टीने विचार करता शेजारी राष्ट्रात जिथे अराजकता माजली असतांना भारतीय स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही भारतीय लोकशाही अबाधित आहे इतकंच काय तर " मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय " असे मानणारे या देशाचे थोर सुपुत्र क्रांतिसूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला एकसूत्रांत बांधून ठेवले आहे
2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक प्रयत्नातून साकार झालेले भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकृत केले व त्या निमित्ताने दरवर्षी 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, डॉ. पल्लवी जुनघरे, राष्ट्रीय सेवायोजना अधिकारी, डॉ विनय कवाडे राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी, प्रा. ललित गेडाम ई ची विचार मंचावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली. यानंतर मान्यवर अतिथीचे मनोगत व्यक्त करतांना बाबासाहेबांचे भारतीय संविधानाविषयीं विचार व्यक्त करण्यात आले तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन प्रा. ललित गेडाम यांच्या पाठोपाठ उपस्थित मान्यवर प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या