बल्लारपूर नगर परिषद निवडणूक, नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक सदस्यांसाठी 33 नामांकन दाखल, उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अंतिम दिवस (Ballarpur Municipal Council elections, 1 nomination filed for the post of Mayor and 33 for the post of Corporator members, last day to file nomination papers tomorrow)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर नगर परिषद निवडणूक, नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक सदस्यांसाठी 33 नामांकन दाखल, उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अंतिम दिवस (Ballarpur Municipal Council elections, 1 nomination filed for the post of Mayor and 33 for the post of Corporator members, last day to file nomination papers tomorrow)

बल्लारपूर :- नगर परिषद निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, रविवार पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवारी दाखल झाली आहे. तर सदस्य पदासाठी विविध प्रभागांमधून ३३ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. दरम्यान, उद्या (१७ नोव्हेंबर) नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी पूजा रहिकवार (बीएसपी) यांनी एकमेव अर्ज दाखल केला आहे. तर सदस्य पदासाठी प्रभाग २ ब मधून ओंकार महंतो (अपक्ष), प्रभाग २ अ मधून रोहित जंगमवार (आप) व विशाल पाझारे (बीएसपी), प्रभाग ३ अ मधून सौ. वैशाली कवाडे व पवन मेश्राम (अपक्ष), प्रभाग ३ ब  मधून काजल डाखरे (बीएसपी) व शिल्पा चुटे, प्रभाग ४ ब मधून फैजल अली सय्यद (आप), प्रभाग ५ ब मधून मंजुषा अय्यर, प्रभाग ७ अ मधून मनीषा अकोले (आप), प्रभाग ७ ब मधून कैलाश मोटघरे, प्रभाग ८ अ मधून समाप्ति झामरे (आप), तर प्रभाग ८ ब मधून मनोज वानखेडे (अपक्ष) व अजयपाल सुर्यवंशी (आप) यांनी अर्ज सादर केला आहे. प्रभाग ९ अ मधून प्रा. नागेश गंडलेवार (आप) यांनी १५ नोव्हेंबर रोजीच नामनिर्देशन दाखल केले होते. प्रभाग १० अ मधून रुपेश रायपुरे (बीएसपी) व सुमित चंदू डोहने (राकॉ), प्रभाग १० ब मधून रेहाना इरफान शेख (बीएसपी) व ताजिया सईद शेख (राकॉ), प्रभाग ११ ब मधून गणेश रहिकवार (बीएसपी) व इस्माईल ढाकवाला, प्रभाग १४ अ मधून मनीषा बहुरीया (बीएसपी) व ज्योती बाबरे (आप), प्रभाग १४ ब मधून प्रकाश दोतेपल्ली (अपक्ष) व प्रशांत गदाला (अपक्ष) यांनी नामनिर्देशन दाखल केले आहे. प्रभाग १५ अ मधून प्रवीण सातपुते (राकॉ), प्रभाग १५ ब मधून लता झुंगरे (राकॉ) व स्नेहा गौर (आप), प्रभाग १६ अ मधून कलावती मलय्या (बीएसपी) व शुभम बहुरिया (अपक्ष), प्रभाग १६ ब मधून सलमा सिद्दीकी (आप), तसेच प्रभाग १७ ब मधून रामकिसन प्रजापती (बीएसपी) आणि सलीम अहमद (अपक्ष) यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. उद्या अर्जाचा अंतिम दिवस असल्याने आणखी उमेदवार उमेदवारी दाखल करणार आहे. शहरातील निवडणूक वातावरणाला आता अधिकच रंगत आली असून, सर्वांचे लक्ष उद्याच्या घडामोडींवर केंद्रीत झाले आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)