धक्कादायक ! विद्यार्थ्याने वस्तीगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या, प्राचार्यासह 4 व्यक्तीवर गुन्हा दाखल (Shocking ! Student commits suicide by hanging himself in hostel room, case registered against 4 people including principal)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! विद्यार्थ्याने वस्तीगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या, प्राचार्यासह 4 व्यक्तीवर गुन्हा दाखल (Shocking ! Student commits suicide by hanging himself in hostel room, case registered against 4 people including principal)

चंद्रपूर :- जनता करिअर लॉन्चरच्या वस्तीगृहात वास्तव्याला असलेल्या प्रथमेश गुलाब चुधरी (१७) रा. धानोरी पिपरी, या विद्यार्थ्याने वस्तीगृहाच्या खोलीत नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान सकाळी ६.३० वाजताची ही घटना पोलिसांनी सायंकाळ उशिरापर्यंत लपवून ठेवली. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार तर नाही ना अशी चर्चा आहे. आत्महत्या प्रकरणी वसतिगृहातील लक्ष्मन स्माजी चौधरी (वार्डन), प्रेमा झोटींग (व्यवस्थापक) , विष्णुदास शरद ठाकरे (सल्लागार) , आशिष किष्णाजी महातळे (प्राचार्य) यांच्या विरुध्द कलम १०७,३(५) भा.न्या.स अन्वये गुन्हा प्राचार्य तथा अन्य अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
             रामनगर परिसरातील जनता कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असलेला प्रथमेश चुधरी या रामनगर परिसरातील जनता करिअर लॉन्चरच्या वसतिगृहात राहत होता. मित्रांसोबत रात्री वस्तीगृहाच्या खोलीत मुक्कामी होता. मात्र गुरुवार २० नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता त्याने खोलीतच नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मित्र खोलीत येताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेची माहिती संस्थाध्यक्ष तथा शाळेच्या मुख्याध्यापक यांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. मात्र ही घटना पोलिसांनी प्रसार माध्यमांपासून लपवून ठेवल्याचे वृत्त आहे. दरम्यान विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मृतक विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली अशीही माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या प्रकरणी मर्ग दाखल केला आहे. प्रथमेश हा शेतमजूर कुटुंबातील मुलगा आहे. आई-वडिलांनी कष्टाच्या पैशातून त्याला मोठ्या आशेने शहरातील कॉलेजमध्ये पाठवले होते. मात्र या आत्महत्येच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक विद्यार्थाचे वडील गुलाब विठुजी चुदरी यांनी पोलिस तक्रारीत प्रथमेश गुलाब चुधरी याने वडिलाना सागीतले की, होस्टेलचे वार्ड बॉय व व्यवस्थापना मधील कर्मचारी त्यांना मानसिक त्रास देत आहे. त्याची मनस्थिती बरोबर वाटत नव्हती. परंतु त्याला आम्ही समजावुन सांगीतले की, तु व्यवस्थीत राहा आम्ही त्याच्या त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक इश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)