जिल्हा परिषद व महानगपालिका निवडणुकीसाठी ऑनलाइन नव्हे तर ऑफलाईन अर्ज भरा - निवडणूक आयोगाचे संकेत (Fill out applications offline, not online, for Zilla Parishad and Municipal Corporation elections - Election Commission's instructions)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हा परिषद व महानगपालिका निवडणुकीसाठी ऑनलाइन नव्हे तर ऑफलाईन अर्ज भरा - निवडणूक आयोगाचे संकेत (Fill out applications offline, not online, for Zilla Parishad and Municipal Corporation elections - Election Commission's instructions)

मुंबई : नगरपरिषद निवडणुकीत ऑनलाइन अर्जाची सुरुवातीला निवडणूक आयोगाने सक्ती केल्याने उडालेला गोंधळ, आलेल्या अडचणी या पार्श्वभूमीवर आता महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ऑफलाइन अर्जच स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन करण्याची संधी सगळ्यांनाच मिळेल. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात शुक्रवारी झाली. यावेळी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाऊन अर्ज भरण्याची पूर्वीचीच पद्धत लागू केली जाईल, असे स्पष्ट केले. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आदी यावेळी उपस्थित होते. नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी आधी ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य केले होते; नंतर ऑफलाइन अर्जाचीही परवानगी दिली.


       दि. २ डिसेंबरला तिथे मतदान झालेले नाही. अशा नगरपरिषदांमध्ये खर्चमर्यादेत वाढ न्यायालयीन आणि अन्य कारणांनी काही नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि प्रभागात आता २० डिसेंबरला मतदान होणार आहे. अशावेळी या ठिकाणी उमेदवारांच्या खर्चमर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी आजच्या बैठकीत अनेकांनी केली. १८ दिवस निवडणूक लांबल्याने खर्चाची आधीची मर्यादा पाळणे शक्य नाही असे त्यांचे म्हणणे होते. आयोगाने ते मान्य केले, येत्या दोन दिवसांत त्याबाबत आदेश निघेल. अशी शक्यता निवडणूक आयोगाकडून वर्तविण्यात आली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)