असाही प्रामाणिकपणा...! स्वच्छता कर्मचाऱ्याने तब्बल १० लाख रुपये असलेली बॅग संबंधित व्यक्तीला केली परत (Such honesty...! A sanitation worker returned a bag containing Rs 10 lakh to the concerned person)

Vidyanshnewslive
By -
0
असाही प्रामाणिकपणा...! स्वच्छता कर्मचाऱ्याने तब्बल १० लाख रुपये असलेली बॅग संबंधित व्यक्तीला केली परत (Such honesty...! A sanitation worker returned a bag containing Rs 10 lakh to the concerned person)

वृत्तसेवा :- तब्बल १० लाख रुपये असलेली बॅग अंजू माने या कचरा वेचक महिलेला सापडली; परंतु त्यांनी ती संबंधित व्यक्तीला ओळख पटवून परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांना साडी आणि काही रोख रक्कम देऊन सत्कार केला. स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ भागात २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. जवळपास २० वर्षे या भागात काम करत असल्यामुळे माने या परिसरातील सर्व नागरिकांना ओळखतात. त्यांनी ओळखीतील नागरिकांच्या मदतीने परिसरातील सर्वांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान एक नागरिक (त्यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांचे नाव आणि ओळख उघड करू शकत नाही) अतिशय अस्वस्थपणे काहीतरी शोधत असल्याचे अंजूताईंनी पाहिले. त्यांनी त्या नागरिकाला बोलवून, आधी पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सापडलेली बॅग त्यांचीच असल्याचे निश्चित करून दहा लाख रक्कम जशीच्या तशी असलेली बॅग परत केली. गोळा केलेला कचरा फिडर पॉइंटला आणताना अंदाजे सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान त्यांना रस्त्याकडेला एक बॅग पडलेली दिसली. यापूर्वीही अशाच औषधाच्या बॅग मिळाल्याचा अनुभव अंजू यांना होता. म्हणून तशीच कोणाची बॅग असेल असा विचार करून त्यांनी ती बॅग फीडर पॉइंटला सुरक्षित ठेवली. बॅग उघडून पाहिल्यानंतर औषधांसोबत त्यात रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)