धक्कादायक...! राजुऱ्यात बँक ऑफ इंडिया एटीएम फोडून तब्बल ९ लाख ३९ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास (Shocking...! Bank of India ATM in Rajura looted, cash worth Rs 9 lakh 39 thousand 500)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक...! राजुऱ्यात बँक ऑफ इंडिया एटीएम फोडून तब्बल ९ लाख ३९ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास (Shocking...! Bank of India ATM in Rajura looted, cash worth Rs 9 lakh 39 thousand 500)

राजुरा :- राजुरा येथील रामपूर परिसरात बँक ऑफ इंडिया एटीएम फोडून तब्बल ९ लाख ३९ हजार ५०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ५.३० च्या दरम्यान घडली असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळाची पाहणी करणारे फिर्यादी संजय देवराव नंदनवार (४८), रा. बाबुपेठ, चंद्रपूर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, हिताची एटीएम कंपनीत इलेक्ट्रिशियन व सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ते दुरुस्तीचे काम पाहतात. सीएमएस कंपनीचे ब्रांच मॅनेजर अल्पेश तांबुसकर (रा. नागपूर) यांनी सकाळी ११.३० वाजता फोन करून घटना कळविली. एटीएम साफसफाई करणारे आझम शेख (रा. रामपूर) हे सफाईसाठी सकाळी ८.३० वाजता गेल्यावर एटीएम कॅशेट कट केलेले व रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले. 
          सीएमएस कंपनीने सर्व्हरवरून रात्री १२ वाजता बॅलन्स तपासला असता त्यात ९ लाख ३९ हजार ५०० रुपये असल्याचे दिसून आले. त्यानंतर संजय नंदनवार यांना घटनास्थळी पाहणीसाठी पाठविण्यात आले. संजय नंदनवार यांनी रामपूर येथील बँक ऑफ इंडिया एटीएमवर पोहोचून पाहणी केली असता कॅश लोडिंग कॅशेट कटरनीने कापून उघडलेले दिसले. त्यातील सर्व रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खात्री झाली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलिसांकडून सुरू आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)