गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विदर्भ राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या माध्यमातून शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे "भारताचे परराष्ट्र धोरण" विषयावर आज राष्ट्रीय परिषद. (National conference on "India's Foreign Policy" today at Shivaji College Rajura through Gondwana University Gadchiroli, Vidarbha Political Science Professors' Conference.)

Vidyanshnewslive
By -
0
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विदर्भ राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या माध्यमातून शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे "भारताचे परराष्ट्र धोरण" विषयावर आज राष्ट्रीय परिषद. (National conference on "India's Foreign Policy" today at Shivaji College Rajura through Gondwana University Gadchiroli, Vidarbha Political Science Professors' Conference.)

राजुरा :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विदर्भ राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा आणि शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22 नोवेंबर 2025 रोजी “भारताचे परराष्ट्र धोरण : ऐतिहासिक मार्ग व समकालीन आव्हाने” या विषयावर आंतरविद्या शाखीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या परिषदेचे उद्घाटक व बीजभाषक म्हणून परराष्ट्र धोरणाचे विश्लेषक व महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर असून अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, विदर्भ राज्यशास्त्र परिषदेच्या अध्यक्षा डॉ. अलका देशमुख, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, सचिव अविनाश जाधव, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले, आयोजक प्राचार्य डॉ.संभाजी वरकड, प्राचार्य संजयकुमार सिंह इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. 
             पहिल्या सत्रात “भारताचे परराष्ट्र धोरण उद्दिष्टे व निर्धारक घटक” हा विषय असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी एमआयटी पुणे विद्यापीठाचे प्रो. डॉ.परिमल माया सुधाकर व तज्ञ मार्गदर्शक म्हणून जेएनयु दिल्ली येथील श्री पंकज फणसे उपस्थित राहणार आहे. तर दुसऱ्या सत्राचा विषय “भारतीय परराष्ट्र धोरणातील बदलते कल” हा असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी शासकीय महाविद्यालय उमरिया मध्य प्रदेश येथील डॉ. नियाज अहमद अन्सारी आहेत तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रशांत विघे, डॉ.संदीप काळे, डॉ. संतोष डाखरे, डॉ.रीता दांडेकर व डॉ. प्रशांत आर्वे इत्यादी मान्यवर तज्ञ मंडळी सहभागी झाले आहे. सदर परिषदेचे संशोधन जर्नल प्रकाशित होत असून संपादक म्हणून डॉ.संदीप तुंडूरवार व प्रा.विजय पंधरे आहेत. सत्र दोन समांतर पद्धतीत आयोजित केले असून संशोधक विद्यार्थ्यांना पेपर प्रेझेंटेशनची संधी असुन या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. अमर बोंद्रे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीकांत शेंडे, डॉ. राजेंद्र झाडे आहेत. परिषदेच्या समारोपीय सत्रात अध्यक्ष म्हणून विदर्भ राज्यशास्त्र परिषदेचे सचिव डॉ.शरद सांबारे तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री.स्वप्निल दंतुलवार, डॉ. लेमराज लडके, श्री.गुरुदासजी कामडी, डॉ.विवेक गोर्लावार, श्री.प्रशांत दंतुलवार, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ.रतन राठोड, डॉ. राहुल वावगे, डॉ.रवी धारपवार, डॉ.विनोद गायकवाड, डॉ.वकील शेख, परिषदेचे संयोजक डॉ. संजय गोरे व डॉ.राजेंद्र मुद्दमवार आहेत. तरी सर्व संशोधक विद्यार्थी प्राध्यापक व मान्यवर मंडळींनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आलेले आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)