स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, गाडीच्या डिक्कीत ठेवलेले दागिने चोरी प्रकरणाचा केला उलगडा, १७ लक्ष ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Local Crime Branch action, solved the case of theft of jewelry kept in the trunk of a car, seized valuables worth Rs. 17 lakh 68 thousand)
चंद्रपूर :- १६ नोव्हेम्बर रोजी विदर्भ टाऊनशिप देवाळा मध्ये राहणाऱ्या ४३ वर्षीय विना वीरेंद्र कुंभरे या मुलीसोबत पांढरकवडा मध्ये जाण्यासाठी निघाले होते, चोरीच्या भीतीने विना ने सोन्या-चांदीचे दागिने घरातील गेटच्या आतमध्ये असलेल्या चारचाकी वाहनात ठेवत गावी गेल्या. २० नोव्हेम्बर रोजी विना आपल्या मुलीसह घरी परतल्या असत्या त्यांनी वाहनात ठेवलेले दागिने बघितले मात्र त्यांना ते कुठेही आढळून आले नाही, वाहनातील दागिने चोरी झाले असे समजताच विना कुंभरे यांनी पडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रार दाखल होताच सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, गोपनीय माहिती मिळवली, पोलिसांनी फिर्यादी तर्फे माहिती घेतली कि वाहनात दागिने ठेवण्याची बाब इतर कुणाला माहिती आहे का किंवा कुणाच्या समोर वाच्यता केली का? मग काय पोलिसांना यावर फिर्यादी यांनी माहिती दिली आणि पोलिसांनी थेट आरोपीला अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वावलंबीनगर, नगिनाबाग मध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय समीर अशोकराव सातपुते ला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा कबूल केला. विना कुंभरे या वाहनात दागिने ठेवत होता, हि बाब आरोपी समीर ला माहिती होती. आरोपी समीर हा फिर्यादी यांच्या ओळखीचा होता अशी माहिती आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी समीर सातपुते कडून सोन १४५ ग्राम-चांदी ८० ग्राम एकूण किंमत १७ लक्ष ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात, पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या