राजुऱ्यात नगराध्यक्ष पदासाठी अरूणभाऊ धोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, नगरविकास आघाडीच्या उमेदवारांचा जल्लोषात नामांकन दाखल कार्यक्रम. (Arunbhau Dhote's candidacy for the post of mayor in Rajura was filed, and the nomination of the candidates of the Urban Development Alliance was filed amidst jubilation.)

Vidyanshnewslive
By -
0
राजुऱ्यात नगराध्यक्ष पदासाठी अरूणभाऊ धोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, नगरविकास आघाडीच्या उमेदवारांचा जल्लोषात नामांकन दाखल कार्यक्रम. (Arunbhau Dhote's candidacy for the post of mayor in Rajura was filed, and the nomination of the candidates of the Urban Development Alliance was filed amidst jubilation.)

माजी आमदार ॲड. वामनराव चटप आणि सुभाषभाऊ धोटे यांची उपस्थिती. 

राजुरा :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना व आरपीआय समर्थित नगरविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अरूणभाऊ धोटे यांनी आज दुपारी २ वाजता तहसील कार्यालय, राजुरा येथे आपला उमेदवारी अर्ज विधिवत दाखल केला. त्यांच्यासह नगरविकास आघाडीच्या नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्र. १ मधून स्वप्नील मोहुर्ले (नामाप्र) व सौ. मंगला विरुटकर (सर्व साधारण महिला) , प्रभाग क्र. २ मध्ये सिद्धार्थ पथाडे (अनुसूचित जाती) आणि मंगलाताई मोकळे (सर्व साधारण महिला), प्रभाग क्र. ३ मध्ये ईश्वर ऊर्फ गोलू ठाकरे (सर्वसाधारण) व पोर्णिमा सोयाम ऊर्फ पोर्णिमा विजय खनके, (अनुसूचित जमाती महिला) प्रभाग क्र. ४ मधून सय्यद जहीर सय्यद नसीम (सर्वसाधारण) आणि सौ. नीता किशोर बानकर (नामाप्र महिला), प्रभाग क्र. ५ मध्ये भाऊजी कन्नाके (अनुसूचित जमाती) व सय्यद फरिना शाकिर सय्यद(सर्वसाधारण महिला), प्रभाग क्र. ६ मध्ये रमेश नडे (सर्वसाधारण) व इंदुबाई निकोडे( नामाप्र महिला), प्रभाग क्र. ७ मधून घनश्याम हिंगणे (सर्वसाधारण) आणि पुणम गिरसावळे(सर्वसाधारण महिला), प्रभाग क्र. ८ मधून दिलीप देरकर (सर्वसाधारण) व वज्रमाला बतकमवार (नामाप्र महिला), प्रभाग क्र. ९ संध्या चंद्रशेखर चांदेकर (अनुसूचित जाती महिला), अनंता ताजने (नामाप्र) आणि अन्नु हरजीतसिंग संधू (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्र. १० मधून भारत रोहणे (सर्वसाधारण) व गीता पथाडे (अनुसूचित जाती महिला) या उमेदवारांनीही नामांकन पत्र भरून निवडणूक रणशिंग फुंकले. नामांकन दाखल करण्यापूर्वी अरूणभाऊ धोटे यांनी साईनगर वार्ड येथील जगन्नाथ बाबा देवस्थान आणि राजुराचे आराध्य दैवत भवानी माता मंदिर येथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर नगर परिषद जवळील हनुमान मंदिर येथे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि मोठ्या समर्थकांच्या उपस्थितीत संकट मोचन हनुमानजीचे दर्शन घेतले. धार्मिक स्थळांवरील भाविक वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाची सुरुवात झाली.


      तहसील कार्यालयात नामांकन दाखल करताना परिसरात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या वेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अड. वामनराव चटप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, शे. संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अड. दीपक चटप, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, धनराज चिंचोलकर, अँड. रामभाऊ देवईकर, दिलीप देठे, कपिल इददे, मधुकर चिंचोलकर, गजानन पहानपटे, किशोर हिंगणे, किशोर ताजने, वैभव अडवे, मंगेश कोंडेकर, सय्यद जाकीर यांच्यासह काँग्रेस, शेतकरी संघटना, आरपीआय व नगरविकास आघाडीचे मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरविकास आघाडीने दाखल केलेले हे नामांकन आगामी नगरपरिषद निवडणुकीत आघाडीची भक्कम एकजूट आणि जनसमर्थनाचे द्योतक ठरल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)