चंद्रपूर :- चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत वने व वन्यजीव संरक्षण अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी, तसेच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांवर तातडीने प्रतिसाद मिळावा यासाठी, रामबाग वसाहतीत अत्याधुनिक वन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या नियंत्रण कक्षाला भेट देऊन यंत्रणेची माहिती घेतली. टोल फ्री क्रमांक उपलब्ध नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18003033 हा आहे. सदर कक्षातून चंद्रपूर वनवृत्तातील वनविभागाविषयी माहिती पाहिजे असल्यास ती तात्काळ प्राप्त होते. विभागाच्या कामकाजा विषयी माहिती मिळण्यास मदत होते. तसेच काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण देखील या कक्षाच्या माध्यमातून केल्या जाते. नियंत्रण कक्ष उभारणीसाठी 11 ऑक्टोबर 2024 रोजी शासन आदेश निर्गमित झाला होता. आता हा कक्ष स्थापन झाला आहे.
घटनांची माहिती एकाच ठिकाणी 'वन नियंत्रण कक्ष' हा चंद्रपूर वनवृत्ताच्या मध्यवर्ती ठिकाणी असून चंद्रपूर वनवृत्तातील घटनांची माहिती एकत्रितरित्या एकाच ठिकाणी साठवून ठेवण्यास मदत होते. या कक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर वनवृत्त व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व वनकर्मचाऱ्यांसह शासकीय वाहनांचे रियल टाईम लोकेशन मिळते. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्यास वनविभागात कार्यरत असलेल्या आर.आर.टी पथकाचा संबंधित विभागाशी समन्वय साधण्यास मदत होते. शासकीय वाहनात फॉरेस्ट कन्सोल स्क्रीन वन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असते. या कक्षामार्फत वन कर्मचाऱ्यांकरिता फॉरेस्ट कंट्रोल नावाचे अँड्रॉइड ॲप तयार करण्यात आले आहे. हे ॲप हाताळण्यासाठी वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यास सदर माहिती संबंधित वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना ॲपच्या माध्यमातून लगेच प्राप्त होते. वन नियंत्रण कक्षाद्वारे शासकीय वाहनांमध्ये सुद्धा फाॅरेस्ट कन्सोल स्क्रीन बसविण्यात आले आहे. अधिकारी दौऱ्यात असल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती शासकीय वाहनात मिळण्यास मदत होते. वनविभागाच्या या पुढाकारामुळे वने आणि वन्यजीव संरक्षण, तक्रारीचे निराकरण व प्रभावी समन्वय साधण्यास मदत होणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या