महात्मा फुले महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपणसह विविध उपक्रमातुन साजरा (World Environment Day celebrated at Mahatma Phule College with various activities including tree plantation)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपणसह विविध उपक्रमातुन साजरा (World Environment Day celebrated at Mahatma Phule College with various activities including tree plantation)


बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारे संचलित महात्मा ज्योतिबा फुले  महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभाग कॉमर्स विभागाच्या इंग्रजी माध्यमा द्वारे जागतिक पर्यावरण दिन आज 5 जून रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. रजत मंडल यांनी भूषविले. कनिष्ठ महाविद्यालय इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका अदिती गहेरवार, दिव्या वर्मा, पल्लवी खनके, लिपिक विशाल पारधी आणि शामराव दरेकर उपस्थित होते. पर्यावरण संरक्षण आवश्यक असल्यामुळे प्रत्येकाने हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे प्राचार्याने आपल्या उदबोधनात सांगितले. वाढदिवसाच्या निमित्ताने अवाढव्य खर्च करण्यापेक्षा प्रत्येकाने एक झाड लावले आणि त्याचे जर संगोपन केले तर पर्यावरण संतुलन राखण्यास आपले मोलाचे सहकार्य लाभ होऊ शकते असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले. या प्रसंगी महाविद्यालय परिसरात विविध प्रकारची झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचे महाविद्यालयाच्या वतीने ठरविण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)