29 जून 1928 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता पाक्षिकाची सुरुवात (29 June 1928 Dr. Babasaheb Ambedkar started the Samata Fortnightly)

Vidyanshnewslive
By -
0
29 जून 1928 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता पाक्षिकाची सुरुवात (29 June 1928 Dr. Babasaheb Ambedkar started the Samata Fortnightly)


वृत्तसेवा :- समता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचे प्रकाशन २९ जून, इ.स. १९२८ रोजी झाले. हे वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांद्वारा समाज सुधार हेतू स्थापित संस्था समता संघाचे (समता सैनिक दलाचे) मुखपत्र होते. याचे संपादक म्हणून बाबासाहेबांनी देवराव विष्णू नाईक यांची नियुक्ती केली होती. इतिहास पंजाबात भाई परमानंद जातपात तोडक मंडळातर्फे समतेची चळवळ चालवीत असत तशाच स्वरूपाचे कार्य व्हावे अशी आंबेडकरांची इच्छा होती. समाज समता संघाचा त्यासाठी उपयोग झाला ही. ब्राह्मण-ब्राह्मणेतर नावाचे एक पत्र ते सन १९२५पर्यंत चालवीत असत. तो काळ ब्राह्मणेतर चळवळीचा होता व नाईक आपल्या पत्रातून वादाची वास्तव भूमिका निर्भीडपणे मांडीत असत ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीतील विचारांचा पगडा त्याच्या मनावर होता. बहिष्कृत भारत आंबेडकरांनी बंद केले, पण समता पत्र पुढे चालू राहिले या पत्राच्या लेखनाची व इतर सर्व जबाबदारी देवराव नाईक व कद्रेकर यांच्याकडे होती. आपले आभार कोणत्या शब्दात मानावे हेच कळत नाही. आपणास 'जनता' पत्राच्या खास अंकासाठी माझी भेट झाल्यावर माझा संदेशच नव्हे तर आर्थिक मदत व त्याहून अधिक काहीतरी देण्याची व्यवस्था करेन. डॉ. आंबेडकर लंडनला जाण्यापूर्वी मुंबईत त्यांना मानपत्र व थैली अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी उत्तरादाखल बोलताना त्यांनी जनता पत्राची घोषणा पुढील प्रमाणे केली की, "बहिष्कृत भारत हे आपल्या पाक्षिकाचे नाव असल्यामुळे ते पत्र बरेच लोक घेत नाहीत. आपले म्हणणे लोकांना कळावे हा उद्देश सफल होत नाही, म्हणून त्या पत्राचे नाव जनता असे ठेवले आहे व देवराव नाईक ह्यांच्या संपादकत्वाखाली ते सुरू राहील". त्याप्रमाणे जनता पाक्षिक २४ नोव्हेंबर १९३० रोजी सुरू झाले. बंद पडलेल्या समता व बहिष्कृत भारतचे वर्गणीदार असलेल्यांना त्यांची वर्गणी संपेपर्यंत जनताचे अंक विनामूल्य पाठवण्यात येत असत. व धार्मिक प्रश्न कसाला लावण्याच्या दृष्टीने त्यांनी जनता पत्रात खास लेख लिहिले. १९३७ साली डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांनीच स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे निवडणूक लढविण्यात आली, त्यावेळी जनता पत्राने विशेष प्रभावी कार्य केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी केंद्रीय कायदेमंत्री म्हणून व राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीच्या अध्यक्ष म्हणून जी अपूर्व कामगिरी बजावली तिची माहिती जनता पत्राने जनतेपुढे ठेवली. १९ ऑक्टोबर १९३१ पासून जनता पत्र साप्ताहिक झाले व १९५६ पर्यंत चालू राहिले. देवराव नाईक यांच्यानंतर भारत कद्रेकर, गणेश सहस्रबुद्धे, बी.सी. कांबळे, यशवंत आंबेडकर इत्यादींनी संपादकाची सूत्रे सांभाळली. १९५६ साली डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर जनता पत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण झाले. पुढे दादा रूपवते, शंकरराव खरात यांनी संपादनाचा भार वाहिला मधू तांबेकर यांनीही प्रबुद्ध भारताला बरेच साहाय्य केले.

संकलन :- मंगेश नामदेव गायकवाड, पुणेशहर,

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)