बल्लारपूर येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न (Diwali Snehamilan program concluded at Ballarpur on the occasion of National Journalists Day )

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न (Diwali Snehamilan program concluded at Ballarpur on the occasion of National Journalists Day )

बल्लारपूर :- 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या हस्ते दिवाळी निमित्त पत्रकार स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपस्थित सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. शिवचंद्र द्विवेदी महाराज, जिल्हा परिवहन सेलचे अध्यक्ष सतविंदरसिंग दारी, भाजप शहराध्यक्ष काशिनाथ सिंग, भाजपा सरचिटणीस मनीष पांडे, नीलेश खरबडे, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव खेडेकर व्यासपीठावर उपस्थित होते, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उपलब्ध आहे. याबाबत पत्रकारांनी चंदेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्याचे सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून बल्लारपूर येथे लवकरच पत्रकार भवन बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
          विकास राजूरकर, श्रीनिवास सर, रमेश निषाद, अनिल देठे, परिष मेश्राम, राहुल गायकवाड, प्रशांत वैरागडे, अनिल पांडे, मुन्ना खेडकर, अजय रासेकर, मनोहर दोतपेल्ली, मंगेश बेले, नरेंद्र सोनारकर, योगेश खेडेकर, श्रीनिवास कुंदकुरी, राजेश खेडेकर, ज्ञानेंद्र आर्य, देवेंद्र झाडे, विसापूर उपसरपंच अनकेश्वर मेश्राम, सुजय वाघमारे, राकेश कांबडे, राजू राठोड, नारद प्रसाद ठाकूर, काशिनाथ सिंग, समीर केणे, विशाल डुंबरे, देवा देशभ्रतार, दीपक भगत, घनश्याम बुरडकर, आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते श्रीनिवास सुंचुवार, देवेंद्र व्हटकर, किशोर मोहुर्ले, सतीश कनकम, कैलास गुप्ता आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर केणे यांनी केले तर आभार घनश्याम बुरडकर यांनी मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)