अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या बल्लारपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सह एकाच कुटुंबातील तिघांचा नदीत बुडून मृत्यू Three members of the same family drowned in the Wardha river, including the former chairman of the Ballarpur Panchayat Samiti who had gone to cremate the bones.

Vidyanshnewslive
By -
0
अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या बल्लारपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सह एकाच कुटुंबातील तिघांचा नदीत बुडून मृत्यू Three members of the same family drowned in the Wardha river, including the former chairman of the Ballarpur Panchayat Samiti who had gone to cremate the bones.

बल्लारपूर :- अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या एकाच कुटूंबातील तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव येथे ही घटना घडली. तीन व्यक्ती अस्थी विसर्जन करण्यासाठी नदीत उतरले होते, त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोविंदा पांडुरंग पोडे (वय ४७), चेतन गोविंदा पोडे ( वय १६ ) आणि गणेश रवींद्र उपरे ( वय १७) अशी मृतांची नावे आहेत. मृत गोविंदा पोडे हे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत. त्याचबरोबर ते बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापतीही होते. एकाच कंटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुडालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र गोविंदा पोडे यांचा शोध अद्याप सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील पोडे कुटुंबातील घनशाम पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी आज (रविवार) त्यांचे नातेवाईक वर्धा-इरई संगमावर नदीत गेले होते. नदीचा प्रवास जास्त असल्याने हे दोघे वाहून जात असताना गोविंदा पांडुरंग पोडे यांनी नदी पात्रात उडी घेतली आणि या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागेल. मात्र नदीचा प्रवाह वेगवान असल्याने तेही वाहून गेले. या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिग परदेशी, चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक सतीश सिंग राजपूत, बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील, बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप यांनी घटनास्थळाला भेट दिली असून शोध कार्य सुरु आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)