धक्कादायक ! रेल्वेच्या गर्दीत श्वास कोंडल्यामुळं प्रवाशाचा मृत्यू, मृत्यूनंतर तब्बल 8 तास मित्राचा मृतदेहासोबत प्रवास ! Shocking ! A passenger died due to suffocation in the crowded train, a friend traveled with the body for almost 8 hours after his death !

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! रेल्वेच्या गर्दीत श्वास कोंडल्यामुळं प्रवाशाचा मृत्यू, मृत्यूनंतर तब्बल 8 तास मित्राचा मृतदेहासोबत प्रवास !  Shocking ! A passenger died due to suffocation in the crowded train, a friend traveled with the body for almost 8 hours after his death !
वृत्तसेवा :- सध्या सणांमुळे ट्रेन व बसेसमध्ये खूप गर्दी असते. दिवाळी संपवून लोक कामाच्या ठिकाणी परतत आहेत. तर बिहारमध्ये छठपूजा असल्याने प्रवासी गाड्यांमध्ये व रेल्वेत गर्दी पाहायला मिळतेय. बिहारमध्ये छठपूजेपूर्वी रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होत असल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला जातोय. मंगळवारी रात्री उशिरा हावडाहून काठगोदामला जाणाऱ्या 13019 बाग एक्स्प्रेसच्या जनरल बोगीत गर्दीमुळे श्वास गुदमरून एका मजुराचा मृत्यू झाला. सारणमधील जैतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील तिवारी टोला येथे राहणारा मजूर दिनेश महातो (32) हा इंजिनपाठच्या तिसऱ्या जनरल बोगीत होता. त्याला सारणमधील एकमा स्थानकावर उतरायचं होतं, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच गर्दीत त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडे जनरल तिकीट आढळलं आहे. जनरल बोगीत जास्त गर्दी झाल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या गावकऱ्याने आसनसोलमधील टीटीईला डॉक्टर उपलब्ध करून देण्यास सांगितलं, परंतु डॉक्टर पोहोचू शकले नाहीत. 
          बुधवारी सकाळी 10.10 वाजता मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी दिनेशचा मृतदेह बोगीतून काढला आणि पोस्टमॉर्टेमसाठी एसकेएमसीएचमध्ये पाठवला. या प्रकरणी मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकाने त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या गावकऱ्याच्या जबाबावरून यूडी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह सारणला नेला. दिनेश महातो हा दुर्गापूर येथील एका प्लॅस्टिक कारखान्यात कामाला होता. छठवेळी कारखाना बंद असतो म्हणून तो इतर कामगारांसह गावी जात होता. महेशने सांगितलं की, चित्तरंजन स्टेशननंतर दिनेशची तब्येत आणखी खालावली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर प्रवाशांनी बोगीत ठेवण्यासाठी जागा करून दिली. बरौनी येथील रेल्वे व रेल्वे स्थानकाच्या कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली. समस्तीपूर रेल्वे पोलीस ट्रेनपर्यंत पोहोचले तोपर्यंत ट्रेन सुटली. त्यानंतर मृतदेह मुझफ्फरपूरमध्ये उतरवण्यात आला. यानंतर महेशने मृतदेहासोबत तब्बल आठ तास प्रवास केला. दरम्यान, दिनेशचे कुटुंबीय त्याच्या संपर्कात होते. त्यांच्या विनंतीवरूनच मृतदेह मुझफ्फरपूरमध्ये उतरवण्यात आला, असं महेशने सांगितलं.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)