अबब ! चंद्रपूरात चक्क चोरट्यानी तहसील कार्यालयातून रेतीने भरलेला ट्रक पळवीला Abba! In Chandrapur, thieves stole a truck full of sand from the tehsil office

Vidyanshnewslive
By -
0
अबब ! चंद्रपूरात चक्क चोरट्यानी तहसील कार्यालयातून रेतीने भरलेला ट्रक पळवीला Abba!  In Chandrapur, thieves stole a truck full of sand from the tehsil office 
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव होत नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती चोरी होत आहे. यावर नियंत्रण घालण्यासाठी प्रशासन तत्परता दाखवत आहे. व एका कारवाईत प्रशासनाने चंद्रपूर - मूल मार्गावरील तहसीलदारांनी रेतीने भरलेला ट्रक पकडून तहसील कार्यालयात जमा केला होता. मात्र दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत चोरट्यांनी चक्क रेतीने भरलेला ट्रकच चोरून नेल्याची घटना उघडकीस आली यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरचे तहसीलदार आपल्या ताफ्यासह गुप्त माहितीच्या आधारा वरून सापळा रचून ट्रक क्र. MH.32-Q-9769 पकडण्यात आला. त्यात रेती आढळल्याने ती जप्त करण्यात आली व वाहन प्रशासकीय इमारतीत आणून पार्क करण्यात आले. दिवाळीच्या रविवारी रात्री चोरट्यांनी संधी साधत प्रशासकीय इमारतीतून संपूर्ण ट्रक पळवून नेला. सदर घटना उजेडात येताच प्रशासनात खळबळ उडाली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)