बल्लारपूर शहरात हत्येचा थरार, विद्यानगर वॉर्डात 5 इसमानी मिळून केली एका तरुणाची हत्या, आर्थिक घटकातुन हत्या झाल्याचा संशय ! Thrill of murder in Ballarpur city, 5 men killed a young man in Vidyanagar ward, suspected to be due to financial reasons !

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- 6 नोव्हेम्बरला रात्रीच्या सुमारास बल्लारपूर शहरात एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. विद्यानगर वार्डातील पंचशील चौकात वास्तव्यास असलेल्या तोडसाम यांना रात्रीच्या सुमारास 5 अज्ञात इसमानी पैश्याचा वादातून तोडसाम नामक युवकाला बेदम मारहाण केली, यासोबतच लाठी, फरशी व दगडाने त्या युवकावर अनेक प्रहार करण्यात आल्याची माहिती असून यामध्ये त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटने बाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, या हत्या प्रकरणातील 5 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये 2 महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे या हत्या प्रकरणाचा पुढील तपास मा. उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)