शासकीय कंत्राटी नोकर भरती आणि सरकारी शाळांच्या छुप्या खाजगीकरण विरोधात 'जन आक्रोश धरणे आंदोलन, लोक कल्याणकारी संघर्ष समिती बल्लारपूर तालुक्याच्या वतीने शासनाला निवेदन (A statement to the Government on behalf of Ballarpur Taluka, People's Welfare Sangharsh Samiti, 'Jan Awach Dharne Andolan' against recruitment of government contract workers and covert privatization of government schools.)

Vidyanshnewslive
By -
0

शासकीय कंत्राटी नोकर भरती आणि सरकारी शाळांच्या छुप्या खाजगीकरण विरोधात 'जन आक्रोश धरणे आंदोलन, लोक कल्याणकारी संघर्ष समिती बल्लारपूर तालुक्याच्या वतीने शासनाला निवेदन (A statement to the Government on behalf of Ballarpur Taluka, People's Welfare Sangharsh Samiti, 'Jan Awach Dharne Andolan' against recruitment of government contract workers and covert privatization of government schools.)

बल्लारपूर :- महाराष्ट्र शासनाच्या बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी नोकर भरती व शाळा खाजगीकरणाबाबतचा जाचक व अत्यंत घातक शासन निर्णयाविरुद्ध बल्लारपूर तालुक्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित बेरोजगार युवक - युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी, कंत्राटी कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सामाजिक व शैक्षणिक संघटना, शासकीय कर्मचारी यांच्या एकजुटीने लोककल्याणकारी संघर्ष समिती बल्लारपूर तालुका तसेच समर्थनार्थ इतर सामाजिक व शैक्षणिक संघटना च्या वतीने जनआक्रोश धरणे आंदोलन दिनांक 13 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत नगरपरिषद चौक बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आले होते.

1) दिनांक 6 सप्टेंबर 2023 चा कंत्राटी तत्त्वावर नोकर भरती संदर्भात काढलेला शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा.

2) राज्यातील 62000 सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण पूर्णपणे रद्द करण्यात यावे.

3) 20 पटसंखेच्या आतील शाळा बंद करू नये व त्यांचे शहरी समूह शाळेत रूपांतर करू नये.

4) जुनी पेन्शन योजना लागू करावी

5) सर्व स्पर्धा परीक्षेचे शुल्क सर्व समुदायाकरिता शंभर रुपये करावे.

6) राज्यातील बेरोजगारांना 5000 रुपये प्रति महिना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा.

7) ग्रामीण व शहरी बेरोजगार व कामगारांना किमान 200 दिवस रोजगार उपलब्ध करून दैनिक भत्ता 600 रुपये देण्याबाबत कायदेशीर तरतूद करण्यात यावी.

8) संविधानाने दिलेल्या संवर्गनिहाय आरक्षणा नुसार सरळ सेवा भरती करण्यात यावी.

9) राज्यातील सर्व समुदायांची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.

10)  राज्यातील अंगणवाडीचे होणारे खाजगीकरण त्वरित थांबविण्यात यावी.

      अशा प्रमुख मागण्या जन आक्रोश धरणे आंदोलनात पत्रकार द्वारे आणि निवेदनाद्वारे समितीच्या वतीने देण्यात आले यावेळी जन आक्रोश धरणे आंदोलनाच्या समर्थनात सहभागी संघटनांच्या प्रतिनिधी आणि युवा विद्यार्थ्यांची समायोचित भाषणे झाली. धरणे आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी अनिल वागदरकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्धशील बहादे तर संयोजकीय मनोगत रवी मेश्राम, रोहित जंगमवार यांनी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पावडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ओबीसी समन्वय समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भूमिपुत्र ब्रिगेड, स्वयं प्रेरित संघटना, स्टडीट्रॅक अकॅडमी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका विसापूर, डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका, स्वयंप्रेरित कार्यकर्ता, डॉ.विनायक तुमराम सार्वजनिक वाचनालय, अश्फाकउल्ला खान वाचनालय, पर्यावरण संवर्धन समिती, आदिवासी उलगुलान उत्कर्ष संस्था, डॉ  बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन, भीमशक्ती फाउंडेशन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ इत्यादी संघटनांनी अथक परिश्रम घेतले यावेळी धरणे आंदोलनात बहुसंख्येने युवा वर्ग उपस्थित होता. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश  न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)