बल्लारपुरात महात्मा गांधी भवनाचा भूमिपूजन सोहळा, विरोधी पक्ष नेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांचा भव्य नागरी सत्कार Bhoomipujan ceremony of Mahatma Gandhi Bhavan in Ballarpur, opposition leader Na. Vijayabhau Vadettiwar's Grand Civil Honor
बल्लारपूर :- शहर कांग्रेस केमेटी तर्फे महाराष्ट्र राज्यातील नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा तसेच नवीन पक्ष कार्यालय महात्मा गांधी भवनाचा प्रशस्त इमारतीचा भुमी पूजन सोहळा आज १३ ऑक्टोबर शुक्रवार रोजी आयोजीत करण्यात आलेले आहेत. भूमी पूजन सोहळा सायंकाळी ६.०० वाजता वस्ती विभागातील महात्मा गांधी भवन येथे सर्वधर्मीय रीती रिवाजाने करण्यात येईल. तसेच सत्कारमूर्ति विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य यांचा नागरी सत्कार सोहळा सायंकाळी ६:३० वाजता सुभाष टाकीज हॉल येथे करण्यात येईल. या कार्यक्रमात सुभाष धोटे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमेटी, आमदार प्रतिभा धानोरकर वरोरा विधानसभा क्षेत्र, सुधाकर अडबाले विधान परिषद सदस्य, अभिजीत वंजारी विधान परिषद सदस्य व डॉ. रजनी हजारे वरिष्ठ काँग्रेस नेत्या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सर्व सन्माननीय प्रतिष्ठीत नागरीक, काँग्रेस पदाधिकारी गण, कार्यकर्त गण, कांग्रेस प्रेमी जनतेनी उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आव्हान अब्दुल करीम अध्यक्ष शहर कांग्रेस कमेटी बल्लारपूर, गोविंदा उपरे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष, देवेंद्र आर्य व सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन व सेल यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या