केरळमधील हरविलेल्या बालकास मिळाले त्याचे पालक, महिला व बालविकास विभागासह चाईल्ड हेल्पलाईनची महत्वाची भुमिका (Missing child in Kerala found his parents, Child Helpline along with Department of Women and Child Development plays an important role)

Vidyanshnewslive
By -
0

केरळमधील हरविलेल्या बालकास मिळाले त्याचे पालक, महिला व बालविकास विभागासह चाईल्ड हेल्पलाईनची महत्वाची भुमिका (Missing child in Kerala found his parents, Child Helpline along with Department of Women and Child Development plays an important role)

चंद्रपूर :- बल्लारपूर रेल्वे पोलिस दलास बल्लारपूर येथे दि. 8 ऑक्टोबर रोजी केरळमधील हरविलेला बालक मिळाला. रेल्वे पोलिस दलाने चाईल्ड हेल्पलाईनला सदर बालकाची माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईन टिमने रेल्वे स्टेशन स्टेशन, बल्लारपूर येथे भेट देत बालकांची संपूर्ण माहिती जाणून घेतली व बालकाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बालकल्याण समितीला दिली. तसेच समितीच्या आदेशान्वये, सदर बालकास शासकीय बालगृह येथे ठेवण्यात आले. बालकल्याण समितीने बालकाच्या पालकांशी संपर्क साधला. चंद्रपूर येथे बालक असल्याचे सांगून पालकांना बोलावून घेतले व या केसबाबत बालकल्याण समितीशी चर्चा केली. दि. 10 ऑक्टोबर रोजी बालकाच्या पालकांना बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले. समितीने सर्व कागदपत्रांची तपासणी करून सदर बालकाला पालकांच्या ताब्यात दिले. सदर प्रकरणात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ, वनिता घुमे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर त्यासोबतच, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले, प्रदीप वैरागडे यांच्यासह चाईल्ड हेल्पलाईन टिमने बालकाला त्याच्या पालकास मिळवून देण्यासाठी महत्वाची भुमिका पार पाडली. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)