महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वतीने सामान्य ज्ञान परिक्षेचे आयोजन, 161 विद्यार्थांनी घेतला सहभाग Organized General Knowledge Examination on behalf of Mahatma Jyotiba Phule College, 161 students participated

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वतीने सामान्य ज्ञान परिक्षेचे आयोजन, 161 विद्यार्थांनी घेतला सहभाग Organized General Knowledge Examination on behalf of Mahatma Jyotiba Phule College, 161 students participated

बल्लारपूर :- महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथिल इंग्लिश मीडियम कॉमर्स विभागा तर्फे दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरीता दहाव्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा आज 15 ऑक्टोबर 2023ला आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेकरिता विद्याश्री कॉन्व्हेंट, वैभव कॉन्व्हेंट, सर्वोदय विद्यालय, साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट, बल्लारपूर पब्लिक स्कूल येनबोडी, न्यू इंडिया कॉन्व्हेंट, बालाजी हायस्कूल, सेंट पॉल कॉन्व्हेंट व एम.जे.एफ स्कूल च्या एकूण १६१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापूर्वी सुध्दा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातर्फे मिशन मून ची जी सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्याच्या यशस्वीतेनंतर या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. एस.एस.सी परीक्षेकरिता त्यांच्या अभ्यासाची उजळणी होईल या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. भविष्यातही अशा प्रकारची परीक्षा महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील इंग्रजी मीडियम कॉमर्स तर्फे आयोजित करावी, अशी आग्रही विनंती काही विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)