डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष
वृत्तसेवा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षक, विशेषतः प्रोफेसर, यांच्याबद्दल अत्यंत उच्च आणि तत्त्वनिष्ठ अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या मते, प्रोफेसर हा केवळ नोकरी करणारा व्यक्ती नसून समाजघडणीचा मुख्य आधारस्तंभ आहे.
१. शिक्षणाबद्दल पूर्ण समर्पण बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की प्रोफेसरने आपल्या विषयात खोलवर प्रभुत्व मिळवले पाहिजे. तो सतत अभ्यास करणारा, नवीन ज्ञान आत्मसात करणारा असावा. “शिकवणे” ही केवळ कर्तव्यपूर्ती नसून बौद्धिक साधना आहे, असे ते मानत.
२. संशोधनाची वृत्ती त्यांच्या मते, चांगला प्रोफेसर केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित राहत नाही. तो संशोधन करतो. नवीन विचार मांडतो. समाजातील प्रश्नांवर बौद्धिक उत्तर शोधतो. म्हणजेच, ज्ञाननिर्मिती ही त्याची जबाबदारी आहे.
३. विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी डॉ आंबेडकरांच्या दृष्टीने प्रोफेसर हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असतो. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणे, स्वतंत्र विचार करायला शिकवणे, प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देणे हे त्याची प्रार्थमिक कर्तव्य आहे. “अंधानुकरण नव्हे, तर विचारशक्ती विकसित करणे” हे त्यांचे ध्येय असावे.
४. बौद्धिक प्रामाणिकता आणि स्वातंत्र्य प्रोफेसरने कोणत्याही राजकीय, सामाजिक दबावाला बळी न पडता सत्याचा शोध घेतला पाहिजे. बौद्धिक स्वातंत्र्य आणि प्रामाणिकता ही त्याची ओळख असावी. ५. समाजाशी नाते बाबासाहेबांच्या मते शिक्षण हे समाजापासून वेगळे नाही. प्रोफेसरने समाजातील समस्या समजून घ्याव्यात. शिक्षणाद्वारे सामाजिक बदल घडवावा. तो “केवळ वर्गात शिकवणारा” नसून समाजपरिवर्तनाचा विचारवंत असावा.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आदर्श प्रोफेसर म्हणजे सतत शिकणारा, संशोधक वृत्तीचा, विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारा, प्रामाणिक आणि स्वतंत्र, समाजाशी जोडलेला असावा. दुर्दैवाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चिंतन व मनन न होता त्यांचे जयंती किंवा महापरिनिर्वाणदिन हे महत्त्वपूर्ण दिवस केवळ उत्सव म्हणून साजरे केले जातात. बाबासाहेबांबद्दल किंवा बुद्ध धम्माबद्दल ज्यांना कोणतेही ज्ञान नाही असे लोक या वर्गणी गोळा करणाऱ्या टोळीचे प्रमुख असल्याचेही दिसते. या पवित्र दिनी जबरदस्तीने, दादागिरीने वर्गणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केली जाताना दिसते. हे बाबासाहेबांच्या उच्च प्रतिमेचा दुरुपयोग असून त्यांच्या उच्च विचारांना छेद देणारे आहे असे वाटते. बाबासाहेबांच्या असामान्य विद्वत्तेला आणि राष्ट्र सेवेला विनम्र अभिवादन!
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या