अखेर चंद्रपूर महापौर पदाबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीचा दिल्लीत निर्णय, वडेट्टीवार-धानोरकांरमध्ये अडीच-अडीच वर्ष महापौर तर ठाकरे सेनेला स्टँडिंग कमिटीचा प्रस्ताव...! (Finally, the Congress party high command in Delhi has made a decision regarding the Chandrapur mayoral post: Wadettiwar and Dhanorkar will each serve as mayor for two and a half years, while the Thackeray faction of Shiv Sena has been offered the chairmanship of the Standing Committee !)

Vidyanshnewslive
By -
0
अखेर चंद्रपूर महापौर पदाबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीचा दिल्लीत निर्णय, वडेट्टीवार-धानोरकांरमध्ये अडीच-अडीच वर्ष महापौर तर ठाकरे सेनेला स्टँडिंग कमिटीचा प्रस्ताव...! (Finally, the Congress party high command in Delhi has made a decision regarding the Chandrapur mayoral post: Wadettiwar and Dhanorkar will each serve as mayor for two and a half years, while the Thackeray faction of Shiv Sena has been offered the chairmanship of the Standing Committee !)

चंद्रपूर :- चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदाचा वाद अखेर सुटला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत चंद्रपुरातील काँग्रेसच्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यात आला आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर झालेल्या बैठकीत विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद मिटवत मध्यममार्ग काढण्यात आला आहे. त्यानुसार, विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला अडीच वर्षांचा महापौर मिळणार आहे. 
        पहिली अडीच वर्ष प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर मिळणार असून, तर उर्वरित अडीच वर्षांमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या गटाला महापौर दिला जाणार आहे. पाच वर्षं काँग्रेसकडे महापौर पद राहील तर शिवसेना ठाकरे गटाकडे स्टॅंडिंग कमिटी राहणार आहे. दोन गटांमध्ये महापौर कोणाचा यावरून निर्माण झालेला वाद थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे गेला होता. यावर तोडगा काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलं आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करत 27 जागांसह काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहिला. चंद्रपुरात काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेची आणि अपक्षांची साथ घेऊन आपल्या महापौर बनवेल असं वाटत होतं. मात्र असं न होता चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला.. ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवर आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात निकालानंतर मोठा संघर्ष उफाळून आला. चंद्रपुरातील काँग्रेसच्या श्रेयाची लढाई एवढी टोकाला गेली की वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी थेट माध्यमांसमोर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरूवात केली. आणि चंद्रपूर काँग्रसचा हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी विजय वडेट्टीवार यांनीं आपल्या समर्थक 18 नगरसेवकांसह दिल्ली गाठली आणि चंद्रपूर काँग्रेसचा हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला. 
              काँग्रेस नेते सुनील केदार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंतांची दिल्लीत भेट घेतली होती. चंद्रपूर महापौरपद, आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेची भूमिका काय? हे जाणून घेण्यासाठी केदारांनी ही भेट घेतली होती. यावेळी केदार आणि सावंतांमध्ये बंद दाराआड चर्चा पार पडली. यावेळी चंद्रपुरात काँग्रेसला आमचा पाठिंबा असून उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं होतं. मंगळवारी रात्री वडेट्टीवार आणि त्यांच्या नगरसेवकांनी दिल्लीत काँग्रेस महासचिव के. सी. वेणूगोपाल यांची भेट घेतली. वडेट्टीवार आणि त्यांच्या नगरसेवकांची दिल्लीत एक बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरही उपस्थित असल्याची माहिती आहे. या बैठकीत चंद्रपूरमधील तिढ्यावर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानुसार महापौरपदासाठी 34 हा बहुमताचा आकडा जुळवाजुळव करण्याचे अधिकार खा. धानोरकर यांना देण्यात आले होते. तर गटनेतेपदी वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाचं नाव निश्चित केलं जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)