महात्मा फुले महाविद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ (Farewell ceremony for 12th-grade students at Mahatma Phule College.)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ (Farewell ceremony for 12th-grade students at Mahatma Phule College.)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाद्वारे 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रोशन फुलकर विभाग प्रमुख (वाणिज्य विभाग), प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. दिवाकर मोहितकर यांची विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली. यानंतर 12 विच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. रोशन फुलकर यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हण्टले की, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबरोबर तंत्रज्ञानाचाही वापर करून ज्ञानात भर टाकावी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या.
   

      याप्रसंगी राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविल्याबद्दल 11वी वाणिज्य च्या विद्यार्थी यश पेंदे यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. रोशन साखरकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. संदीप सोनोने यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)