बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद तसेच मिनी इंडिया म्हणून बल्लारपूर शहराचा उल्लेख केला जातो 2 डिसेंबर ला नगर परिषदेची निवडणूक व 21 डिसेंबर ला लागलेल्या निकाला नुसार काँग्रेस पक्षाचे 17, भाजपचे 7 शिवसेना(उबाठा) 5 राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) 3 शिवसेना(शिंदे) 1, अपक्ष 1 असे बल्लारपूरात 34 नगरसेवक निवडून आले त्यानुसार बल्लारपूर नगर परिषदेत 4 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यासाठी आज बल्लारपूर शहरातील गोंडराजे नाट्य गृहात बल्लारपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सभा सौ. अल्काताई वाढई नगराध्यक्ष बल्लारपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत बल्लारपूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी काँग्रेसचे देवेंद्र आर्य यांची निवड करण्यात आली तर स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेस पक्षातर्फे श्री. भास्कर माकोडे, डॉ. सुनिल कुल्दीवार, भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा, तर शिवसेना (उबाठा) तर्फे श्री. घनश्याम मुलचंदानी यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली काँग्रेसचे नरेश मुंदडा व नासिर खान यांनीही नामांकन दाखल केले होते मात्र नासिर खान यांचे नामांकन नंतर बाद ठरविण्यात आले.
राजे बल्लाळशाह नाट्यगृहात पार पडलेल्या या विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष डॉ. अलका अनिल वाढई यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली. यावेळी उपमुख्याधिकारी संगीता उमरे यांच्यासह कोंग्रेस पार्टीचे गट नेता अब्दुल करीम शेख, भाजपाचे गट नेता महेंद्र ढोके, शिवसेना (उबाठा) चे गट नेता सिक्की यादव, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) चे गट नेता सुमित डोहने, नगरसेवक छाया मडावी, वैष्णवी जुमडे, पवन मेश्राम, शिल्पा चूटे, अंकूबाई भुक्या, मोना धानोरकर, वैशाली हुमने, प्रियंका थूलकर, सय्यद मुकद्दर, मेघा भाले, शारदा माकोडे, इस्माईल ढाकवाला, सुनीता जिवतोडे, रवि मातंगी, करुणा रेब्बावार, लखन सिंह चंदेल, मोहित डंगोरे, नीरज झाड़े , शालू कुमरे, किरण सिंह चंदेल, विद्या खरतड, रंजिता बीरे, मनोज बेले, काजल तोटावार, रजनी मूलचंदानी, शाजिया शेख, प्रणीत सातपुते, अविनाश मट्ठा आणि सलीम नबी अहमद यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र आर्य यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई, प्रभारी शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते व सर्व नगरसेवकांचे आभार मानले. बल्लारपूर शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या