वृत्तसेवा :- नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुजातपूर येथे १८ जानेवारी २०२६ रोजी जेतवन बौद्धभूमी येथे तिसरे भारतीय बौद्ध धम्म परिषद पार पडणार असून,या तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय बौद्ध महिला बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रा.छाया तानबाजी बोरकर यांची निवड झालेली आहे. बौद्ध धर्माचे मानवतावादी मूल्य समाजातील तळागाळा पर्यंत पोहचावे समाजात समता,न्याय बंधुत्व,प्रस्थापित व्हावा तसेच मानवी मूल्याचा प्रचार प्रसार व्हावा माणसात रुजावे यासाठी बौद्ध धर्म परिषद सातत्याने कार्यरत असते. हेच औचित्य साधून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसारासाठी, सामाजिक समता, बंधुता व मानवी मूल्यासाठी त्यांनी केलेला सातत्यपूर्ण केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. प्रा.छाया तानबाजी बोरकर यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, क्षेत्रात कार्यरत असून मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. तसेच साहित्य क्षेत्रात विशिष्ट प्रकारचे योगदान असून प्रा.छाया बोरकर यांचे पळसफुले काव्यसंग्रह, अडला हरी गाढवाचे पाय धरी, माणसाने खाल्ल्या मिठाला जागावं,शेर शिजला ईस्तो इजला, हिरवाई मनात जपताना चारोळी संग्रह, "रणरागिणी" कादंबरी, "शापित शृंखला" काव्यसंग्रह, झाडीच्या झुरवा काव्यसंग्रह, जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे, "हो,मी सावित्री बोलता"नाटक असे अनेक साहित्य प्रकाशित असून "जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे" विद्येचा थोर विधाता" हे पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. आपल्या निवडीबद्दल जेतवन संस्थेच्या संस्थापक ,साहित्यिका सामाजिक कार्यकर्ते मा. सावित्रीताई शेवाळकर आणि त्याचे सर्व सहकार्य याचे मनापासून आभार मानले...
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या