चंद्रपुरात ६ व ७ फेब्रुवारी २०२६ ला राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ४२ वे वार्षिक अधिवेशन आणि दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन (The 42nd annual conference of the Political Science and Public Administration Association and a two-day interdisciplinary national conference will be organized in Chandrapur on February 6th and 7th, 2026.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर : डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि चिंतामणी महाविद्यालय, घुग्घुस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ४२ वे वार्षिक अधिवेशन आणि दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. 'मानवविद्याशाखेतील नवीन सिद्धांत, प्रवाह आणि व्यवहार' या मुख्य विषयावर देशभरातील विचारवंत मंथन करणार आहेत. दि. ६ फेब्रुवारीला पहिल्या सत्रात कोल्हापूरचे राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. विठ्ठल दहिफळे (नांदेड), डॉ. परिमल माया सुधाकर (पुणे), डॉ. पी. डी. अप्पा देवरे (नाशिक) आणि ज्येष्ठ साहित्यिक तथा राजकीय विश्लेषक प्रा. सुरेश द्वादशीवार मार्गदर्शन करतील. ७ फेब्रुवारी दुसऱ्या सत्र विद्यापीठाचे डॉ. दीपक पवार, तंदूरवार (नागपूर), डॉ. अजय चंद्राकार (रायपूर), डॉ. विकास जांभुळकर (नागपूर), डॉ. श्याम शिरसाठ (संभाजीनगर) आणि डॉ. ब्रह्मदीप अलोणे  (मध्य प्रदेश) हे तज्ज्ञ विचार आहेत. अध्यक्षस्थानी अड. राहुल घोटेकर तर मुख्य अतिथी म्हणून विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन अधिष्ठाता डॉ. श्याम खंडाळे यांच्यासह डॉ. अलका देशमुख, डॉ. संजय गोरे, प्रशांत दोन्तुलवार, अशोक घोटेकर आणि वामनराव मोडक यांची राहणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)