बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. संजयभाऊ कायरकर, अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, मा. अंकितभाऊ कायरकर, डॉ. बालमुकुंद कायरकर यांची उपस्थिती होती 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहन पार पडले त्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत व एनसीसी गीत गाण्यात आले तदनंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक रित्या वाचन करण्यात आले.
एनसीसी च्या कॅडटस नी यावेळी मान्यवर अतिथीना सलामी देऊन विविध कवायती व प्रात्यक्षिक सादर केले भारतीय सैन्यात सेवा देणाऱ्या 4 विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच विविध क्रीडा प्रकारात यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने पि.एचडी मिळविणाऱ्या डॉ. स्वप्नील बोबडे, डॉ. सतिश कर्नासे यांचा मा. संजयभाऊ कायरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर डॉ. रजत मंडल यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रा. शुभांगी भेंडे व आभार प्रदर्शन डॉ. पंकज कावरे यांनी केले यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या