छाया मडावी, करुणा रेब्बावर आणि लखनसिंह चंदेल स्थायी समिती सदस्य
बल्लारपूर :- बल्लारपूर नगरपरिषदेची विशेष बैठक दि .२०/०१/२०२६ रोजी दुपारी ४ वाजता राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे पीठासीन अधिकारी व मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सभापति आणि स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या विशेष बैठकीत, नवनिर्वाचित उपाध्यक्ष देवेंद्र आर्य यांची स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या पदसिद्ध सभापति म्हणुन एकमताने निवड करण्यात आली. तसेच अब्दुल करीम शेख यांची सार्वजनिक बांधकाम, इस्माईल ढाकवाला यांची पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण, पवन मेश्राम यांची विकास आणि नियोजन, प्रियंका थुलकर यांची शिक्षण व मेघा भाले यांची महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माजी नगराध्यक्ष छाया मडावी, लखन सिंह चंदेल आणि करुणा नरसिंह रेब्बावर यांची स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. नगराध्यक्ष अलका अनिल वाढई, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, मुख्याधिकारी विशाल वाघ आणि विशेष सभेला उपस्थित असलेल्या सर्व नगरपरिषद सदस्यांनी नवनिर्वाचित सभापति आणि स्थाई समिति सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या