ताडोबा म्हणजे केवळ जंगल नाही तर भारताच्या वनवैभवाची आंतरराष्ट्रीय ओळख ! (Tadoba is not just a forest, but an international symbol of India's rich forest heritage !)

Vidyanshnewslive
By -
0
ताडोबा म्हणजे केवळ जंगल नाही तर भारताच्या वनवैभवाची आंतरराष्ट्रीय ओळख ! (Tadoba is not just a forest, but an international symbol of India's rich forest heritage !)

चंद्रपूर :- वनविभागातर्फे आयोजित लोहारा सफारी गेटच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मनस्वी आनंद लाभला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक अधिक व्यापक व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मागील केंद्रीय अर्थसंकल्पात मा. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशातील ५० ठिकाणे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत ताडोबाचा आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात समावेश व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 


       चंद्रपूर जिल्ह्यातील मूल्यवान टिकवुडचा वापर अयोध्येतील श्रीराम मंदिर, संसद भवन, भारत मंडपम तसेच पंतप्रधान कार्यालयातील फर्निचर निर्मितीसाठी करण्यात आला आहे. या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशावर आधारित भव्य ‘टिकवुड संग्रहालय’ बल्लारपूर येथे उभारण्यात येणार असून, त्यामध्ये राम-लक्ष्मण लाकूड तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला साक्ष देणारी लाकडे जतन केली जाणार आहेत. यावेळी, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक आर. रामानुजम, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश विभागीय वनाधिकारी राजन तलमले उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)