राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर, मुंबई खुला प्रवर्गासाठी तर कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती साठी राखीव (The reservation draw for the mayoral posts of 29 municipal corporations in the state has been announced; Mumbai is reserved for the general category, while Kalyan-Dombivli is reserved for Scheduled Tribes.)
मुंबई :- राज्यातील महानगरपालिकांसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापौरपदावर नेमकं कोण बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आज मोठा निर्णय झाला असून राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत मंत्रालयात जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाला महापौरपद मिळणार, हे स्पष्ट झालं आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आज जाहीर झालेल्या सोडतीनुसार राज्यातील 29 पैकी 1 महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. 3 महापौरपदे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष आरक्षणाचा समावेश राहणार आहे. 8 महापालिकांमध्ये महापौरपद ईतर मागास प्रवर्गसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 17 महापौरपदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठेवण्यात आली आहेत.
मुंबई - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
ठाणे - 'एससी' अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग
नवी मुंबई - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
मीरा भाईंदर - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
वसई विरार - खुला प्रवर्ग
कल्याण डोंबिवली - 'एसटी' अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्ग
भिवंडी- निजामपूर - खुला प्रवर्ग
उल्हासनगर - 'ओबीसी' अर्थात इतर मागास प्रवर्ग
पुणे - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
पिंपरी चिंचवड - खुला प्रवर्ग
कोल्हापूर - 'ओबीसी' अर्थात इतर मागास प्रवर्ग
इचलकरंजी - 'ओबीसी' अर्थात इतर मागास प्रवर्ग
सांगली मिरज कूपवाड - खुला प्रवर्ग
सोलापूर - खुला प्रवर्ग
छत्रपती संभाजीनगर - खुला प्रवर्ग
लातूर - 'एससी' अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
जालना - 'एससी' अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
पनवेल - 'ओबीसी' अर्थात इतर मागास प्रवर्ग
अकोला - 'ओबीसी' अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
अहिल्यानगर - 'ओबीसी' अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
चंद्रपूर - 'ओबीसी' अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
जळगाव - 'ओबीसी' अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
अमरावती - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
धुळे - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
नांदेड वाघाळा - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
नागपूर - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
नाशिक - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
परभणी - खुला प्रवर्ग
मालेगाव - खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या