पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी धनादेश वटविण्यासंदर्भात त्वरीत संपर्क करावा, समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावर यादी प्रसिध्द (Award-winning students should contact us immediately regarding the encashment of cheques; the list has been published on the Social Welfare Department's website.)

Vidyanshnewslive
By -
0
पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी धनादेश वटविण्यासंदर्भात त्वरीत संपर्क करावा, समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावर यादी प्रसिध्द (Award-winning students should contact us immediately regarding the encashment of cheques; the list has been published on the Social Welfare Department's website.)

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हास्तरावर कामकाज सुरू, पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर :- इयत्ता 10 वी, 12 वी च्या परिक्षेला विशेष उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. सदर योजनेअंतर्गत वर्ष 2022-23 आणि 2023-24 मध्ये पात्र विद्यार्थ्यांना धनादेशाद्वारे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी पुरस्काराचा धनादेश आजपर्यंत बँकेतून वटविला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या नावांची यादी समाज कल्याण विभागाच्या www.acswchandrapur.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीतील विद्यार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत पुरस्काराचा वटविण्यात न आलेला धनादेश सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयात जमा करून नवीन धनादेश प्राप्त करून घ्यावा. अन्यथा एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुरस्काराची रक्कम शासन खाती जमा करण्यात येईल. परिणामी कालावधी संपल्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचा धनादेश मिळणार नाही. यासाठी विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी कळविले आहे.
                 इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत 13 उपकंपन्यांची स्थापना शासनाने केली आहे. यात लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी समाज), स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज), श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज), संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज), सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज), संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज), संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज), आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत समाज), संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज), संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (नाभिक समाज), महामंडळाचे जिल्हा स्तरावर चंद्रपूर येथे कामकाज सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. महामंडळामार्फत सहा योजना राबविल्या जात असून त्यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, या पूर्णत: ऑनलाईन स्वरूपाच्या आहेत. या योजनांसाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. 20 टक्के बीज भांडवल योजना व थेट कर्ज (रु.1 लक्ष पर्यंत) योजना या ऑफलाईन स्वरूपाच्या असून त्याचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर, दूरध्वनी क्र. 07172-262420 या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के. के. सातपुते यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)