चंद्रपूर महापालिकेचे महापौर ओबीसी महिला साठी राखीव, काँग्रेस व भाजप कडून अनेक संभाव्य नावे समोर (The Chandrapur Municipal Corporation mayoral post is reserved for an OBC woman, and several potential candidates have emerged from both the Congress and BJP parties.)
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगर पालिकेसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. ही जागा महिला ओबीसीसाठी राखीव सोडण्यात आली आहे. चंद्रपुरात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी इथं कोणत्याच पक्षाकडं बहुमत नाही. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी चंद्रपुरात किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. आमच्या पक्षाला जो महापौर पद देईल, त्याच्यासोबत आम्ही युती करू, अशी भूमिका ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाला आहे. हा गट ज्याला समर्थन देईल त्याची महापालिकेवर सत्ता येईल. जर इथं काँग्रेसची सत्ता आली तर महापौर कोण होईल? आणि भाजपची सत्ता आली तर महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, याची संभाव्य यादी आता समोर आली आहे. त्यामुळे इथं कुणाची सत्ता येणार याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गट तिन्ही पक्षाकडून इथं महापौर पदावर दावा केला जात आहे. काँग्रेसकडून संभाव्य महापौर (1) वैशाली महाडोळे, (2) चंदा वैरागडे, (3) संगीता भोयर, (4) संजीवनी वासेकर, (5) संगीता अमृतकर, तसेच भाजपकडून संभाव्य महापौर (1) आशा देशमुख, (2) अनुजा तायडे, (3) संगीता खांडेकर, (4) सारिका संदूरकर यांच्या पैकी कुणाला संधी मिळतेय की ऐनवेळी नवीन नाव राजकीय पक्षांकडून समोर येते हे पाहणं ओसूत्याच ठरणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या