बल्लारपूर :- वेकोली (WCL) अंतर्गत कार्यरत लाइट व्हेईकल ड्रायव्हरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक ८ डिसेंबर रोजी भरणाऱ्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आंदोलनात जवळपास २०० वाहन चालकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. चालकांच्या मुख्य मागण्यांमध्ये वेतनमान (Wages) प्रमाणे योग्य पेमेंट, दररोज ८ तास ड्युटीची अंमलबजावणी, वीकली रेस्टची हमी, तसेच वार्षिक बोनस, या सर्वांचा समावेश आहे. सदर मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने मजूर वर्गात मोठा नाराजीचा सूर आहे. आंदोलनाचे नेतृत्व वेकोली असंगठित मजूर संघ यांनी केले.
संघाचे अध्यक्ष शंकरदास, तसेच पदाधिकारी अशफाक शेख, चेतन बोडे, सुनील टेकाम, रवि गारे, गौतम कांबळे, रोशन बोमनवार, मनिष टेकाम यांच्यासह इतर अनेक ड्रायव्हर्सही मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “ड्रायव्हर्सवर कामाचा मोठा ताण असूनही योग्य वेतन आणि सुविधा दिल्या जात नाहीत. कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी कंपनीने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.” आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या