शिवाजी पार्कमधील ५ आणि ६ डिसेंबर रोजी पुस्तक विक्रीतून २ ते ३ कोटींची उलाढाल (Book sales in Shivaji Park on December 5th and 6th generated a turnover of Rs 2 to 3 crores)

Vidyanshnewslive
By -
0
शिवाजी पार्कमधील ५ आणि ६ डिसेंबर रोजी पुस्तक विक्रीतून २ ते ३ कोटींची उलाढाल (Book sales in Shivaji Park on December 5th and 6th generated a turnover of Rs 2 to 3 crores)

'जग बदलणारा बाप माणूस' पुस्तकाला अनुयायांकडून सर्वाधिक पसंती


मुंबई :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरांतून आलेल्या आंबेडकरी अनुयायींकडून शिवाजी पार्क येथील ग्रंथ प्रदर्शनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक खरेदीतून सुमारे २ ते ३ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली. यंदाच्या वर्षी शिवाजी पार्कवरील बुक स्टॉलवर 'जग बदलणारा बापमाणूस' पुस्तकाला आंबेडकरी अनुयायी, तरुण तरुणी भीमसैनिकांची सर्वाधिक पसंती दिसून आली. ५ आणि ६ डिसेंबर या दोन दिवसांत सुमारे ५ हजार प्रती विकल्या गेल्याची माहिती लेखक जगदीश ओहोळ यांनी दिली. तसेच पार्कमधील पुस्तक विक्रेत्यांकडून सुध्दा आपल्या स्टॉलवर सदर पुस्तक उपलब्ध व्हावे, यासाठी ओहोळ यांच्याकडून आगाऊ प्रती विकत घेऊन विकल्या जात होत्या. शिवाजी पार्कवर ५ आणि ६ डिसेंबर जग बदलणारा बापमाणूस या दोन दिवसांत सुमारे २ लाख पुस्तके, ग्रंथ, भारतीय संविधानाच्या प्रती आणि इतर महापुरुषांची पुस्तके, साहित्य विक्री होते. देशभरांतील विविध साहित्यिकांसह लेखकांची पुस्तके एकाच छताखाली अनुयायींना खरेदीसाठी उपलब्ध होतात. " मी नागपूर येथून गेल्या २५ वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये पुस्तक विक्रीसाठी येतो. दोन दिवस पुस्तक विक्रीतून कमाई करून पुन्हा नागपूरकडे रवाना होतो. दोन दिवसांत आमची सुमारे ३ ते ४ हजार पुस्तकांची विक्री होते. " - देवेंद्र तिरपुडे, संविधान बुक डेपो
           यामुळे आंबेडकरी अनुयायींचा पुस्तक खरेदीकडे मोठा ओढा असतो. शिवाजी पार्कवर यंदा सुमारे ३०० ते ४०० स्टॉल लावण्यात आले होते. ज्यामुळे वर्धा, नागपूर, पुणे, नाशिक अशा ठिकाणांहून वाचक आणि व्यापाऱ्यांनी गर्दी केली ही पुस्तके विक्रीसाठी पार्कमधील सर्व स्टॉलवर महामानव डॉ. बाबासाहेव आंबेडकर, भारताचे संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, शुद्र पूर्वी कोण होते, असा मी घडलो, माझी आत्मकथा, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, "जग बदलणारा बापमाणूस" सह इतर अनेक पुस्तके, साहित्य विक्रीसाठी होती. समग्र संविधानालाही मागणी प्रा. पंकज भारतीय इंगळे लिखित 'समग्र संविधान' हे समजेल अशा सोप्या शब्दांत लिहिले आहे. यात मूळ संविधान, संविधान सभेतील डिबेट याचा संदर्भ नमूद करून लिखाण केले आहे. यामुळे वाचकांची या पुस्तकालासुध्दा पसंती दिसून आली. दोन दिवसांत ५०० ते १०० प्रती विकल्याची माहिती प्रा. पंकज इंगळे यांनी दिली होती. एका पुस्तकामागे वाचकांना ७०% पर्यंत सवलत मिळते. त्यामुळे खरेदीसाठी आंबेडकरी अनुयायींची गर्दीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असते, अशी माहिती शैलेंद्र बुक स्टॉलचे विक्रेते शैलेंद्र कांबळे यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)