बल्लारपूर :- क्रेसेंट पब्लिक स्कूल आणि क्रिएटिव माइंड्स प्री-स्कूलतर्फे आयोजित “सुप्रभात हेरिटेज मिलन” या विशेष कार्यक्रमासाठी आपणास हार्दिक निमंत्रण आहे. दिनांक 13 डिसेंबर 2025 ला सकाळी 9:00 वाजता बल्लारशाह किल्ला या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना व नागरिकांना बल्लारशाहच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणे हा आहे. कार्यक्रमाचा विशेष आकर्षन श्री बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी, भारत सरकार
यांच्याकडून बल्लारशाहच्या इतिहासावरील रोचक कथन सादर केले जाणार आहे. आपल्या माध्यमातून हा उपक्रम समाजापर्यंत पोहोचेल आणि वारसा संवर्धना बाबत जनजागृती होण्यास मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे. अशी माहिती क्रेसेंट पब्लिक स्कूल आणि क्रिएटिव माइंड्स प्री-स्कूल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या