धक्कादायक..! राज्यात लाडकी बहीण योजनेत, 32 कोटींचा भ्रष्टाचार, बोगस लाभार्थ्यांकडून, राज्य शासनाची फसवणूक (Shocking..! In the state's 'Ladki Bahin' scheme, a corruption of ₹32 crore has been uncovered, with the state government being defrauded by bogus beneficiaries.)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक..! राज्यात लाडकी बहीण योजनेत, 32 कोटींचा भ्रष्टाचार, बोगस लाभार्थ्यांकडून, राज्य शासनाची फसवणूक (Shocking..! In the state's 'Ladki Bahin' scheme, a corruption of ₹32 crore has been uncovered, with the state government being defrauded by bogus beneficiaries.)


मुंबई :- राज्यात लाडकी बहीण योजनेत 32 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तर राज्यातील बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. लाडकी बहीणसंदर्भात आतापर्यंतचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सरकारी वसुली सुरु होणार आहे. तर राज्यातील सरकारने स्वतः ही माहिती दिली आहे. राज्यात भाजपा सरकारच्या योजनेत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीच मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे दिसत आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकीकडे महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना, दुसरीकडे भाजपा सरकारने 32 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती दिली आहे. शासनाचे नुकसान झाल्याची कबुली सरकारनेच दिली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजना संदर्भात आतापर्यंतचा मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 32 कोटींच्या नुकसानाची भरपाई अधिकारी व कर्मचारी यांच्यासकडून केली जाणार आहे. वसुली सुरु होणार आहे, असे सरकारने माहिती दिली आहे. 
       राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची 32 कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. राज्यातील अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल 32 कोटींचे नुकसान करण्यात आले आहे. राज्यामध्ये 26 लाख अपात्र महिला आणि 14 हजार 297 पुरुषांनी लाभ घेतल्याची सरकारनेच माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकीकडे महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना, दुसरीकडे सरकराने तब्बल 32 कोटी रुपयांचे नुकसान दिल्याची झाल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. राज्यातील अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे 32 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. राज्यामधील 26 लाख अपात्र महिला आणि 14 हजार 297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली आहे. अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याचे उघड झालं आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवलेल्या शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून लाभाची रक्कम वसुल केली जाणार असल्याची माहिती सरकारने लेखी स्वरुपात दिली आहे. याप्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपा आमदालाच झापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीणचा उल्लेख केल्याने भाजपाच्याच आमदाराला झापले आहे. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांना कडक शब्दांत समज दिली आहे. राज्यात लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या ही अवैध दारू विक्री असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सभागृहात सांगितले आहे. हे सांगताना त्यांनी ही लाडक्या बहिणींची समस्या असल्याचे म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका अशा शब्दांत समज दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीशी जोडू नका, असे सांगितले होते. तरीही स्वपक्षाचे आमदार यांनी लाडकी बहीणींचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे मदत झाली नाही तर राज्यात 32 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. 
        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी पहिले वर्ष पूर्ण होत असताना, ज्युबिलंट डेटा यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. यावेळी लाडकी बहीण संदर्भातही प्रश्न विचारण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना खरंच मदत झाली आहे का? असा प्रश्न विचारला असता 64 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे 26 टक्के थोडीफार मदत झाली असे सांगितले आहे. 8 टक्के लोकांनी हा फक्त राज्यातील भाजपा सरकारचा देखावा असल्याचे म्हटले आहे. 2 टक्के लोकांनी मात्र माहिती नाही असे सांगत उत्तर देणे टाळले आहे. म्हणजे थोडक्यात फायदा झाला असे सांगणाऱे आकडे मोठे आहे. परंतु प्रत्यक्षात राज्यातील भाजपा सरकारच्या लाडकी बहिण योजनेत 32 कोटींचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे , अशी माहिती शासनाने दिली आहे. राज्यातील काही शासकीय अधिकारी व कर्मचारी मिळून व बोगस लोकांनीच या योजनेचा फायदा घेतल्याची माहिती मिळाली आहे, असे राज्यातील सरकारनेच म्हटले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)