धक्कादायक ! चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारांच्या शोषणा विरोधात ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात पुन्हा एक गंभीर गुन्हा दाखल (Shocking! Another serious case has been registered at the Brahmapuri police station in Chandrapur district against the exploitation by illegal moneylenders.)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारांच्या शोषणा विरोधात ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात पुन्हा एक गंभीर गुन्हा दाखल (Shocking! Another serious case has been registered at the Brahmapuri police station in Chandrapur district against the exploitation by illegal moneylenders.)

चंद्रपूर :- अवैध सावकारांच्या शोषणाविरोधात चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात पुन्हा एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अवैध सावकारीविरोधातील पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. १९ डिसेंबर २०२५ रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी फिर्यादी राजकुमार दादाजी बावणे (वय ३२) यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादी सिटी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कार्यरत असून, लोकांना पैसे देण्यासाठी त्यांनी ब्रम्हपुरी येथील लक्ष्मण पुंडलिक उरकुडे याच्याकडून वेळोवेळी एकूण ८ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी फिर्यादीने सोनार, मुथुड मनी, नातेवाईकांकडून तसेच स्वतःचे घर गहाण ठेवून एकूण ३१ लाख ४२ हजार ६०० रुपये आरोपी सावकाराला दिल्याचा आरोप आहे. तरीही अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे वसूल करून आर्थिक, मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
              या तक्रारीच्या आधारे आरोपी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (४५), रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अपराध क्रमांक ६५६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (५) तसेच महाराष्ट्र सावकारी (विनियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पोलिसांनी पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, कोणीही अवैध सावकार मुद्दलाच्या पोटी अवाजवी व्याज आकारून आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक छळ करीत असल्यास तात्काळ जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ किंवा ७८८७८९०१०० या क्रमांकावर माहिती द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच अवैध सावकारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)