चंद्रपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलचे देवेंद्र फडणवीस, डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते २२ डिसेंबर रोजी होणार लोकार्पण (The Cancer Hospital in Chandrapur will be inaugurated on December 22nd by Devendra Fadnavis and Dr. Mohan Bhagwat.)
चंद्रपूर -: चंद्रपूर परिसरासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक क्षण आहे. महाराष्ट्र शासन आणि टाटा समूहाच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे. हे केवळ एक आरोग्य केंद्र नसून, चंद्रपूर-गडचिरोली सारख्या दुर्गम, आदिवासीबहुल जिल्ह्यांतील लाखो कुटुंबांसाठी नवे आशास्थान ठरणार आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी वेळेवर व सुलभ उपचार मिळणे येथे मोठे आव्हान होते. ही गरज ओळखून शासनाने पुढाकार घेतला आणि टाटा समूहासारख्या विश्वासार्ह सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते २२ डिसेंबर रोजी होणारे लोकार्पण या सेवाकार्याला नैतिक अधिष्ठान देणारे आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रसेवा, समाजकल्याण आणि मानवी मूल्यांचा संदेश अधिक व्यापक होणार आहे. चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीत आमचे सहकारी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दाखवलेली तळमळ विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करत या प्रकल्पासाठी भक्कम भूमिका बजावली. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून त्यांनी हे कार्य केले. त्यांची संवेदनशीलता, चिकाटी आणि दूरदृष्टी या प्रकल्पामागील महत्त्वाची प्रेरणा ठरली आहे. दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे हे आमचे ध्येय असून, हे कॅन्सर हॉस्पिटल त्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे. या पवित्र आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या टाटा समूहातील वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते प्रत्येक सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि या होणाऱ्या लोकार्पण समारंभास हार्दिक शुभेच्छा देतो.
राज्याच्या अर्थमंत्री पदावर असताना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा आयाम देणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेल्या पंडित दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. महानगरपालिका निवडणूक आचारसंहिते मुळे लोकार्पण सोहळ्याला मला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही मात्र नागरिकांनी या लोककल्याणकारी प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आ. मुनगंटीवार यांनी कार्यशील दृष्टिकोन आणि विकासनिष्ठ सेवाव्रत यांच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली. “विकास हा धर्म” आणि “समाजहित हे ध्येय” या धोरणातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केला. या वाटचालीत चंद्रपूरच्या जनतेसाठी टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे, तो म्हणजे 280 कोटी रु. किंमतीचे 140 बेडेड पंडित दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय.
2014 मध्ये अर्थमंत्री झाल्या पासून आ. मुनगंटीवार यांनी या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला. दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. दि. 26 जून 2018 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला. जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने 280 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आज पूर्णत्वास आले आहे. पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे. या कॅन्सर हॉस्पिटलची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.तळमजला + ४ मजले, अंदाजे १,००,०००+ चौ.फुट क्षेत्रफळ, १४० बेड क्षमतेचे अत्याधुनिक उपचार केंद्र, कॅन्सर निदान व उपचारासाठी सुसज्ज तंत्रसामग्री :यात सीटी सिम्युलेटर (CT-S), मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, 3D/4D आणि इलास्टोग्राफीसह उसग, सीटी – १६ स्लाइस आणि स्पेक्ट, २ रेषीय प्रवेगक (Linear Accelerators), ब्रेकीथेरपी, डिजिटल एक्स-रे, विशेष उपचार विभाग यात केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, आधुनिक प्रयोगशाळा सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), रक्तविज्ञान (Haematology), हिस्टोपॅथोलॉजी आदींचा समावेश आहे. या सर्व बाबींमुळे हे रुग्णालय पूर्वविदर्भातील सर्वात सक्षम, सुसज्ज आणि पूर्णत्वाने Cancer Care देणारे केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पाबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांची टाटा समूहाचे प्रमुख स्व. रतनजी टाटा यांच्याशी चर्चा होत असताना त्यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण सर संघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आ. मुनगंटीवार यांनी श्री मोहनजी भागवत यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता त्यांनी 22 डिसेंबर रोजी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली, त्या नुसार श्री मोहनजी भागवत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालया पाठोपाठ कॅन्सर रुग्णालया सारखा महत्वाचा आरोग्य प्रकल्प साकारत आहे. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात 14 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्यात आली असून बल्लारपूर, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालय, मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, उमरी पोतदार, कळमना येथे स्मार्ट प्रा. आ. केंद्र तसेच आरोग्य संकुले पूर्णत्वास आली आहेत. आरोग्य सेवेचे नवे मानदंड जिल्ह्यात निर्माण करणाऱ्या मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेले हे कॅन्सर रुग्णालय रुग्णसेवेचे प्रशस्त दालन ठरणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या