स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तिघांवर कारवाई; तीन ट्रॅक्टरसह १५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त (Local Crime Branch action, action against three people involved in illegal sand transportation; Three tractors and valuables worth Rs. 15 lakh 15 thousand seized)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने राजुरा परिसरात अवैधरित्या गौण खनिज (रेती) वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करून तीन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह १५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ४ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर करण्यात आली. या प्रकरणात राजुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. ५९८/२०२५ नोंदवून आरोपींवर कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३, तसेच कलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, आणि कलम १७७ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
          विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेने राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून अवैध रेतीवाहतुकीत गुंतलेले आरोपी राजेश्वर श्रीधर मालेकर, शुभम नामदेव मुसळे, सचिन भिमराव मडावी, तिन्ही रा. आर्वी, ता. राजुरा यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रेतीची चोरटी वाहतूक करण्यासाठी वापरलेले तीन ट्रॅक्टर-ट्रॉली किंमत १५ लाख रुपये तसेच ३ ब्रास अवैध रेती किंमत १५ हजार रुपये असा एकूण १५,१५,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दीपक कॉक्रेडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, आणि पोअं. गोपीनाथ नरोटे यांनी केली. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)