शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ (Deadline for filling online application forms for Scholarship Examination (Class 5) and Pre-Secondary Scholarship Examination (Class 8) extended till December 8)
वृत्तसेवा :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी नियमित शुल्कासह ८ डिसेंबरपर्यंत शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. विलंब शुल्कासह १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २३ डिसेंबर तर अति विशेष विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही माहिती भरता येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असेही परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या