भद्रावतीच्या वृषाली पांढरे व ब्रम्हपुरीचे अविनाश राऊत तसेच राजुऱ्यातील जुबेर शेख ठरले निवडणुकीचे 'खरे विजेते'
चंद्रपूर :- निवडणूकित तसेच राजकारणात विजय किती मतांनी मिळाला, यापेक्षा विजय मिळाला की नाही, हेच अंतिम सत्य ठरते. कुणी हजारो मतांनी जिंकतो, तर कुणी अवघ्या एका मताने किंवा थेट ईश्वरचिठ्ठीच्या आधारे. मात्र अशा अटीतटीच्या लढतीत विजय मिळविणारेच खऱ्या अर्थाने 'जो जिता वही सिकंदर' ठरतात. यंदाच्या नगरपालिकांच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात अशाच थरारक आणि लक्षवेधी निकाल पाहायला मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यात तीन ठिकाणी थरारक लढती पहायला मिळाल्याची प्राथमिक माहिती असून ब्रम्हपुरी नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक भद्रावती नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अविनाश राऊत यांनी उत्कठावर्धक लढतीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सारंग रमेश बनपूरकर यांचा अवघ्या एका मतांनी पराभव केला आहे.
भद्रावतीत प्रभाग १२ मध्ये भाजपच्या उमेदवार वृषाली विनोद पांढरे यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत निवडणुकीतील प्रत्येक मताची किंमत अधोरेखित केली. विशेष म्हणजे, या विजयामागे त्यांच्या वयोवृद्ध सासूबाईंचे एक मत निर्णायक ठरले. सून निवडणुकीत उभी असल्याचे समजताच त्या खास वणीहून मतदानासाठी आल्या आणि त्या एका मतानेच विजयाची दिशा बदलली. राजुरा नगरपालिकेतही तितकाच थरार अनुभवायला मिळाला. प्रभाग क्रमांक १० मध्ये अपक्ष उमेदवार जुबेर शेख आणि काँग्रेस-शेतकरी संघटनेचे भारत रोहणे यांना प्रत्येकी ४०६ मते मिळाल्याने निकाल पूर्णतः बरोबरीत अडकला. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वरचिठ्ठीचा आधार घेतला आणि त्यात जुबेर शेख यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांचा विजय घोषित झाला. या निवडणुकीत कौटुंबिक राजकारणाचेही वेगवेगळे रंग दिसले. भिसी नगर पंचायतमध्ये सख्खे भाऊ पंकज आणि सचिन गाडीवार आमनेसामने होते, यात धाकट्या पंकजने मोठ्या भावाचा पराभव केला. तर बल्लारपूरमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवार चैताली मुलचंदानी यांचा पराभव झाला, तर त्याचवेळी त्यांच्या सासूबाई रजनी मुलचंदानी नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. यासोबतच बल्लारपूर मध्येच प्रभाग 1 मध्ये भाजपचे लखनसिह साधूसिंग चंदेल प्रभाग 13 मधून किरण साधूसिंग चंदेल या बहीण-भावाचा नगरसेवक म्हणून विजय झाला आहे तर राजुरा मध्येच सिद्धार्थ पथाडे आणि त्यांची पत्नी गीता पथाडे हे दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या