चाळीस हून अधिक नगरसेवकांच्या जोरावर काँग्रेसचा महापौर चंद्रपूर मध्ये बसणार, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ६६ पैकी २८ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवत महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवला. चंद्रपूर महापालिकेतील भाजपचे अपयशी, आणि जनविरोधी कारभाराला जनतेने नाकारले, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.या विजयाने संपूर्ण चंद्रपूर शहरात काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष, फटाके व गुलाल उधळून हा विजय साजरा करण्यात आला. आजच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजपच्या भ्रष्ट धोरणांमुळे, फसव्या घोषणा आणि सत्तेच्या अहंकारामुळेच जनतेने भाजपला नाकारले आहे. चंद्रपूरकरांनी विकास, पारदर्शकता आणि जनहितासाठी काँग्रेसवर पुन्हा विश्वास टाकला आहे. महागाई, बेरोजगारी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, बोगस पट्टे वाटप, कोट्यवधींचे घोटाळे आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे भाजपविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष होता. या निवडणुकीत जनतेने त्याचा स्पष्ट निकाल दिला आहे.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शहरातील विविध प्रभागांत घवघवीत यश मिळवत भाजपचा पराभव केला.. या निवडणुकीत काँग्रेसचे २८ नगरसेवक जिंकले असून जनविकास सेना यांचे तीन नगरसेवक काँग्रेस बरोबर आहेत. पक्षाने तिकीट न दिलेले आणि बंडखोरी करून दोन अपक्ष उमेदवार हे निवडून आले आहेत.ते देखील चंद्रपुरात काँग्रेस बरोबर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ६ जागा जिंकल्या आहेत. ही आकडेवारी पाहता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसणार, चंद्रपुरात सत्ता स्थापन करणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केले. विजयानंतर काँग्रेस कार्यालयासह शहरातील विविध भागांत विजयोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नागरिकांनीही काँग्रेस नेतृत्वावर विश्वास दाखवत चंद्रपूरचा विकास काँग्रेसच्या हातूनच शक्य असल्याची भावना व्यक्त केली. आ. विजय वडेट्टीवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करताना, हा विजय सत्तेसाठी नाही, तर जबाबदारीसाठी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत पारदर्शक, स्वच्छ आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी चंद्रपूर वासियांना दिले.
काँग्रेसचे विजयी शिलेदार : जनसेवेचा नवा संकल्प !चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून ऐतिहासिक विजय संपादन करणाऱ्या आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक बांधवांचे आणि भगिनींचे मनापासून अभिनंदन ! जनतेने दिलेल्या या कौलाचा आदर करत, आज सर्व विजयी शिलेदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. हा विजय केवळ एका पक्षाचा नसून चंद्रपूरच्या उज्ज्वल भविष्याचा आणि विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. आपल्या सर्वांच्या सोबतीने शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अभिनंदन पात्र विजयी शिलेदार :शास्त्रीनगर प्रभाग २ मधून सचिन विनोद कत्याल, बंगाली कॅम्प प्रभाग ४ मधून संगिता मंगल भोयर, विवेकानगर प्रभाग ५ मधून सुनंदा दिलीप धोबे, वनश्री केशव मेश्राम व अभिषेक गजानन डोईफोडे, इंडस्ट्रियल इस्टेट प्रभाग ६ मधून राजेश मुरली अड्डुर, वडगाव प्रभाग ८ मधून अजय निळकंठराव बल्की, मनिषा विलास बोबळे, प्रतीक्षा अक्षय येरगुळे व प्रदीप (पप्पू) देशमुख, नगिनाबाग प्रभाग ९ मधून सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले व वैशाली अजय महाडुळे, एकोरी मंदिर प्रभाग १० मधून राहुल अरुण घोटेकर, संजिविनी राजू वासेकर व साफिया तवंगर खान, भानापेठ प्रभाग ११ मधून शिला दत्तु सिडाम, राहुल गेंदलाल चौधरी व सईदा बेगम ताजु शेख, महाकाली मंदिर प्रभाग १२ मधून करुणा शंकर चालखुरे व संगिता गोपाल अमृतकर, बाबुपेठ प्रभाग १३ मधून विनोड हरिश्चंद्र लभाने व रामनरेश कुवरलाल यादव, पठाणपुरा प्रभाग १४ मधून वसंतराव राजेश्वरराव देशमुख, वैशाली प्रकाश चंदनखेडे व सुनील गोपालदास खंडेलवाल, हिंदुस्थान लालपेठ प्रभाग १६ मधून करिश्मा बिट्टू जंगम, अनिता हनुमान चौखे व चंदा मनोज वैरागडे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग १७ मधून आकाश मिलींद मानकर व महानंदा रविंद्र वाळके.
आपल्या सर्वांच्या कार्यातून सामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत आणि चंद्रपूर शहर विकासाचे मॉडेल बनावे, यासाठी आपणा सर्वांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या