चंद्रपूरच्या महानगर पालिका आयुक्त पदी अकनुरी नरेश यांची नियुक्ती (Akanuri Naresh appointed as Chandrapur Metropolitan Municipality Commissioner)
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगर पालिका पंचवार्षिक निवडणुकीचे वेध लागले असतांना राज्य सरकारने चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त पदी IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती प्राप्त होत असून या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सामान्य प्रशासन विभागाने ११ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी अकुनूरी नरेश यांची चंद्रपूर महानगर पालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री यांना ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रात महानगरपालिकेतील वाढती अव्यवस्था, भ्रष्टाचाराच्या तक्रारी, निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि रस्तेव्यवस्थेतील कुचराई याकडे लक्ष वेधले होते.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या आयुक्त पदी श्री. अकुनुरी नरेश यांची नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी अकनुरी नरेश यापूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण तसेच सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक येथे यशस्वीपणे कार्यरत होते. तसेच विपीन पालिवाल चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त होते मात्र त्यांची धारावी पुनरविकास मुंबई येथे बदली झाली होती व चंद्रपूर महानगर पालिकेच्या प्रभारी आयुक्त पदी विद्या गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली होती अकनुरी नरेश हे तेलंगणाची एक भारतीय नागरी सेवक (IAS) अधिकारी असून, त्यांनी IIT मद्रासमधून शिक्षण घेतले आहे आणि UPSC नागरी सेवा परीक्षेत उच्च पद मिळवले आहे. त्याच्या सामान्य पार्श्वभूमीसाठी आणि कठोर परिश्रमासाठी त्याचे नाव घेतले जाते त्याचे वडील सफाई कामगार म्हणून काम करतात जे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण त्याने IIT मद्रासमधून बी.टेक आणि एम.टेक (दुहेरी पदवी) घेतली आहे. त्यानी UPSC नागरी सेवा परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आणि AIR 782 (2019) रँक मिळवला. त्याच्या वडिलांनी सिंगारेनीमध्ये सफाई कामगार म्हणून काम केले आणि त्याने त्याच्या कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने यश मिळवले, ही त्याची कहाणी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे ते महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत आणि 2022 च्या बॅचमध्ये सामील झाले. अकुनूरी नरेश यांच्या नियुक्तीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता वाढेल, भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळेल आणि विविध विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. “चंद्रपूर शहराच्या प्रगतीसाठी दूरदृष्टी असलेला अधिकारी आवश्यक होता आणि आता शहराला ते नेतृत्व मिळाले आहे, असे त्या म्हणाल्या. नव्या IAS आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर महानगरपालिकेत सकारात्मक बदल घडून नागरिकांच्या दीर्घकाळच्या अपेक्षा पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या