बल्लारपुर :- निवडणुकीचे वारे वाहने सुरु झाले असून नामांकन जाहीर होताच सर्व पक्षीय तसेच स्वतंत्र उमेदवारांनी आप आपली प्रचार मोहीम सुरू केली आहे. त्यातच. बल्लारपुरात आंबेडकरी अनुयायी तसेच समर्थकांनी सुध्दा आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष रिपाई पक्षा नंतर बाळासाहेब आंबडेकर यांनी स्थापन केला. आंबेडकरी घटक, राजकिय पक्ष भारतीय बौध्द महासभा, तसेच विचारवंत आणि मतदार यांनी बल्लारपुरात वचित बहुजन आघाडी चे नगराध्यक्ष पदाकरीता (OBC) या प्रवर्गातून सौ. ज्योत्सना दिपक वाळके यांनी नामनिर्देशित केले आहे. नामांकन झाल्यावर पहिली पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष उमेश कडू यांनी 19/11/2025 रोजी वं.ब.आ. बल्लारपूर च्या कार्यालयात आयोजीत केली. या पत्रकार परिषदेत वं.ब. आघाडी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश तावाडे यांनी म्हटले की बल्लारपूर शहरात आमच्या पक्षाचे 11 नगर सेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाकरीता ज्योत्स्ना दीपक वाळके यांना विजयी करण्याकरिता इतर अपक्ष असलेल्या उमेदवारांशी समर्थनार्थ चर्चा करण्यात आली. तसेच भारतीय बौद्ध महासभा, सामाजिक संघटना यांनी पाठिंबा देण्याची हमी दिली. त्यामुळे आमचा विजय नक्की होईल. नगराध्यक्ष पदाकरिता वंचित बहुजन आघाडी पक्षातून उभे असलेले सौ ज्योत्स्ना दीपक वाळके यांनी पत्रकाराची बोलताना सांगितले की मी एक व्यावसायिक आहे. परंतु बरेच वर्ष मी सामाजिक कार्यात घालविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरले परंतु जर माझा विजय झाला तर शहरांमध्ये आरोग्याच्या सोयी, शैक्षणिक सुविधा तसेच शहरातील रखडलेल्या विकासाला गती देत जनहितार्थ कार्य निस्वार्थपणे करेल.. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्ष कविता गोरकार, बल्लारपूर शहर निरीक्षक रूपचंद निमगडे, महिला जिल्हा आघाडीचे सल्लागार सत्यभामाताई भाले, महिला तालुका अध्यक्षा नम्रता साव, शहराध्यक्ष उमेश कडू, महिलाच अध्यक्ष रेखा बागडे, भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष गायत्री रामटेके, रमण पुणेकर, राकेश पेटकर, गौतम रामटेके, अभिलाष चूनारकर, देवराव नंदेश्वर, दुरेश तेलंग, इत्यादी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या