बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : एकूण २०० उमेदवार, नगराध्यक्षसाठी ९ तर नगरसेवक पदासाठी १९१ उमेदवार रिंगणात (Ballarpur Municipal Council Election: Total 200 candidates, 9 for Mayor and 191 for Corporator post in fray)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर नगर परिषद निवडणूक :  एकूण २०० उमेदवार, नगराध्यक्षसाठी ९ तर नगरसेवक पदासाठी १९१ उमेदवार रिंगणात (Ballarpur Municipal Council Election: Total 200 candidates, 9 for Mayor and 191 for Corporator post in fray)

बल्लारपूर :- २०२५ च्या बल्लारपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ९ आणि नगरसेवक पदासाठी १९१ उमेदवार रिंगणात आहेत. बल्लारपूर नगराध्यक्षची निवडणूक लढवणाऱ्या अनेक महिला शहरातील प्रसिद्ध चेहरे आहेत, ज्यांना राजकीय पक्षांनी निवडणुकीत उभे केले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणूक  चुरशीची होण्याची अपेक्षा आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत १९१ उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध आढळले आहेत. सर्वाधिक १८ उमेदवार प्रभाग क्रमांक ८ मध्ये निवडणूक लढवत आहेत. तर सर्वात कमी ६ उमेदवार प्रभाग क्रमांक ६ मध्ये आहेत. ओबीसी महिला प्रवर्गातून फक्त दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत, त्यापैकी एक माजी नगरसेवक आणि भाजप उमेदवार जयश्री मोहुर्ले आहेत आणि दुसरी काँग्रेस उमेदवार मोना धानोरकर आहेत. येथे भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती. रेणुका सुधाकर दुधे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने श्रीमती अल्का अनिल वाढई, बहुजन समाज पक्षाच्या वतीने श्रीमती पूजा अमर राहिकवार, वंचित बहुजन आपडीच्या वतीने जोत्स्ना दीपक वाळके, आरपीईच्या वतीने वंदना पंचशील तामगाडगे मानिने शिवसेना (ऊबाठा), वतीने डॉ. चैताली दीपक मुलचंदानी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाच्या वतीने रोजिदा ताजुद्दीन शेख, आम आदमी पक्षाच्या वतीने मंजुषा श्रीराम अय्यर आणि अपक्ष ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनील कुल्दीवार यांनी नामांकन पत्र सादर केले. नगरसेवक पदासाठी प्रभाग १ - अ ५, ब ७, प्रभाग २ - अ १०, ब ४, प्रभाग ३ - अ १०, ब ४, प्रभाग ४ - अ ३, ब ५, प्रभाग ५ अ ३, ब ४, प्रभाग ६ - अ २, ब ४, प्रभाग ७ - अ ४, ब ९, प्रभाग ८ – अ ६, ब १२, प्रभाग ९ – अ ४, ब ३, प्रभाग १० - अ ५, ब ५, प्रभाग ११ – अ ४ ब ६, प्रभाग १२ – अ ८ , ब ३, प्रभाग १३ – अ ६, ब ९, प्रभाग १४ – अ ५, ब ८, प्रभाग १५ – अ ८, ब ४, प्रभाग १६ – अ ६, ब ३, प्रभाग १७ – अ ४, ब ८ आहेत. विशेष म्हणजे प्रभाग ७ आणि ८ मध्ये, प्रभाग १३, १४, १५ आणि १७ मध्ये चुरशीची लढत असल्याचे दिसून येत आहे. बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचे वितरण झाले. प्रभाग ९ अ मध्ये माजी नगरसेवक व्यंकटेश बाल बहरिय्या यांना स्थानिक पातळीवरून एबी फॉर्म देण्यात आला, तर त्याच प्रभागातील माजी नगरसेवक नासिर खान यांनी प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म घेतला. एकाच प्रभागासाठी एकाच पक्षाचे दोन एबी फॉर्म आल्याने मोठा पेच निर्माण झाला. त्यामुळे छाननीत विलंब झाला. दोन्ही उमेदवारांच्या वकिलांनी आपापली बाजू निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडली. प्रत्येक प्रभागात संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. लोकप्रिय चेहरे, महिला उमेदवारांची मजबूत उपस्थिती आणि प्रभागनिहाय वाढती स्पर्धा पाहता यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)