चंद्रपूर :- विदर्भातील अकराही जिल्ह्यांतील शंभर नगर परिषदा व पंचायती यांच्यावरील सत्तासंघर्षाचे अंतिम चित्र आज शुक्रवारला (दु.३ वाजता नंतर) स्पष्ट होईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत आहे. त्यानंतर सर्व पदांवरच्या लढती निश्चित होतील. विदर्भातील ८० नगर परिषदा व २० नगर पंचायती, अशा एकूण १०० शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मंगळवार, ता. २ डिसेंबर रोजी या १०० परिषदा व पंचायतींमधील एकूण २४५२ जागांसाठी मतदान होणार आहे. यात शंभर नगराध्यक्षांच्या जागा असून त्या नागरिकांमधून थेट निवडण्यात येणार आहे. बुधवार, ता. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.
निवडणुका होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील ४० परिषदा व ५ पंचायतींचा समावेश आहे. त्यात ४५ नगराध्यक्ष व ११२५ नगरसेवक पदांच्या जागा आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील ४० परिषदा व १५ पंचायतींचा समावेश असून त्यात ५५ नगराध्यक्ष व १२२७ नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक २७ शहरांमध्ये या निवडणुका होत असून त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील १२ शहरांमध्ये, तर सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्यात केवळ तीन शहरांमध्ये निवडणुका होत आहे. यवतमाळ, बुलढाणा व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ११, अकोला, वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी ६, वाशीम जिल्ह्यात ५ व भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी चार शहरामंध्ये निवडणुकांचा धुराळ उडाला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या