सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी (The birth anniversary of the Father of the Nation, Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri, was celebrated on October 2 at the Public Works Sub-Divisional Office, Ballarpur.)

Vidyanshnewslive
By -
0
सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी (The birth anniversary of the Father of the Nation, Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri, was celebrated on October 2 at the Public Works Sub-Divisional Office, Ballarpur.)

बल्लारपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात २ ऑक्टोबर रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला उपविभागीय अभियंता संजोग मेंढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अभियंता वैभव जोशी, अभियंता पवन सावरकर, अभियंता अनिल आंबटकर, अभियंता लीनता खोरगडे, अभियंता महिमा डोंगरे, तसेच हनीफ कुरेशी, अरविंद कुचनकर, शीतल पोडे, चित्रा मेश्राम, माधवी मेश्राम, हर्षल दासरवार, हरिदास डंबारे, बावणे गिरडकर, सौदागर आदी कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. 
       या वेळी बोलताना उपविभागीय अभियंता संजोग मेंढे यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी जगाला सत्य व अहिंसेचे शस्त्र दिले. त्यांचे जीवन हे साधेपणाचे प्रतीक होते. तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान – जय किसान या घोषणेतून देशातील शेतकरी व सैनिक यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या विचारांचे पालन करणे हेच खरी जयंती साजरी करण्याचे औचित्य ठरेल.यानंतर इतर मान्यवरांनीही गांधीजींच्या स्वच्छतेच्या संकल्पनेबाबत तसेच शास्त्रीजींच्या त्याग, प्रामाणिकपणा व साधेपणावर प्रकाश टाकला. या दोन्ही महान नेत्यांचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कार्यक्रमात सर्व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याची शपथ घेतली. शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)